Big Breaking: लस नाही तर प्रवास नाही; मविआ सरकारचा मोठा निर्णय  Saam Tv
महाराष्ट्र

Big Breaking: लस नाही तर प्रवास नाही; मविआ सरकारचा मोठा निर्णय

राज्य सरकारने नव्या नियमावलीनुसार, राजकीय सभांना, जाहीर कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक

मुंबई : राज्य सरकारने (State Government) नव्या नियमावलीनुसार, राजकीय सभांना, जाहीर कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र नियम पाळले जात नसतील तर संबंधित आयोजकांवर 50 हजार दंड आकारण्याबरोबर कार्यक्रम बंद करण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आला आहे.

हे असतील नियम-

- लसीकरण पूर्ण झालेल्यांनाच आता सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करता येणार आहे. राज्य सरकारने जारी केली नवी नियमावली जाहीर केली आहे.

- मुंबईतील लोकल प्रमाणे एसटी, बससेवा, टॅक्सी, रिक्षा याने प्रवास करायचा असेल तर दोन डोस घेतलेल्यांनाच परवानगी देण्यात आली आहे.

- कोरोनाचे नियम न पाळणार्‍यांविरुद्ध दंडाची व्याप्ती वाढवण्याचाही निर्णय घेण्यात आलं आहे.

- रिक्षा, टॅक्सीत बसलेल्या प्रवाशाने मास्क वापरला नसेल तर प्रवाशाला ५०० रुपये आणि रिक्षा-टॅक्सी चालकालाही ५०० रुपये दंड आकारला जाणार आहे.

- दुकानात ग्राहकांने मास्क घातला नसेल तर ग्राहकाला ५००, तर संबंधित दुकानदाराला १० हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.

- मॉल्समध्ये ग्राहकांने मास्क घातला नसेल तर मॉल्स मालकाला ५० हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.

- राजकीय सभांना, जाहीर कार्यक्रमांना परवानगी, मात्र नियम पाळले जात नसतील तर आयोजकांवर ५० हजार दंड आकारण्याबरोबर कार्यक्रम बंद करण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला

- वानखेडे स्टेडियममध्ये होणाऱ्या ३ ते ७ डिसेंबर दरम्यान होणार्‍या भारत-न्यूझीलंड कसोटी सामन्याच्या पार्श्वभूमीवर स्टेडियम आणि खुल्या मैदानात २५ टक्के प्रेक्षकांना उपस्थितीस परवानगी देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shirdi Ke Sai Baba : 'शिर्डी के साईबाबा' फेम अभिनेत्याची प्रकृती गंभीर; उपचारासाठी शिर्डीकरांकडून मदतीचा हात

१.८६ लाखांचा मोबाईल ऑर्डर केला, बॉक्स उघडताच इंजिनिअरच्या पायाखालची जमीन सरकली ; पाहा VIDEO

Dharashiv : 'जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत नागपूर सोडणार नाही', लहुजी शक्ती सेनेचा इशारा | VIDEO

Maharashtra Live News Update: नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे होत नसल्याने नंदुरबारमध्ये शेतकरी संतप्त

Pune Tourism : वीकेंडला करा फॅमिली ट्रिप, पुण्याजवळ वसलाय 'हा' ऐतिहासिक किल्ला

SCROLL FOR NEXT