Maharashtra Political Crisis Eknath Shinde Uddhav Thackeray News Saam TV
महाराष्ट्र

उद्धव साहेबांना का सोडता ? मातोश्रीवर या कोणी रागावणार नाही; सेना खासदाराची बंडखोरांना साद

'त्यांना हजारो कोटींचा निधी मिळाला तरी म्हणतात, आम्हाला निधी नाही, निधी मिळूनही का रडता ?'

लक्ष्मण सोळुंके

औरंगाबाद : आमदार संजय शिरसाट आठवड्यातून ५ दिवस मुंबईत असतात, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी शिरसाट यांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिलं आहे. खैरे म्हणाले, 'त्यांना हजारो कोटींचा निधी मिळाला तरी म्हणतात आम्हाला निधी नाही, निधी मिळूनही तुम्ही का रडता ? असा सवाल शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी सनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी विचारला आहे.

शिवसेनेचे बंडखोर आमदार सध्या गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये वास्तव्यास असून या ठिकानाहून अधून मधून काही फोटो आणि व्हिडीओ समोर येत आहेत. अशातच काल शिवसेनेचे दिग्गजनेते आणि सध्या महाविकास आघाडीला ज्यांनी सुरुंग लावला आहे ते मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या ट्विटरवरुन एक व्हिडीओ (Video) प्रसारीत केला. त्या व्हिडीओमध्ये बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी महाविकास आघाडीवर अनेक आरोप केले आहेत.

हे देखील पाहा -

आम्हाला हवा तसा निधी मिळाला नाही शिवाय आम्ही गद्दार नाही तर बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आहोत असं ते या व्हिडीओमध्ये म्हणत आहेत. शिवाय याबाबत शिरसाट यांनी एक पत्र देखील मुख्यमंत्र्यांना लिहलं आहे. त्यामध्ये देखील खूप धक्कादायक खुलासे करत उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) सल्लागारांसह संजय राऊतांवरती निशाणा साधला आहे. हे पत्र खूप चर्चेत आलं होतं.

याच सर्व पार्श्वभूमीवर आता शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांना प्रश्न विचारत त्यांनी मातोश्रीवर यावं अशी साद घातली आहे. खैरे म्हणाले की, 'आमदार संजय शिरसाट आठवड्यातून ५ दिवस मुंबईत असतात, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा संजय शिरसाट यांच्यावर हल्लाबोल. त्यांना हजारो कोटींचा निधी मिळाला तरी म्हणतात आम्हाला निधी नाही.

निधी मिळूनही तुम्ही का रडता ? का उद्धव साहेबांना सोडता ? रसद मिळली म्हणून मागे लागतात का? या मातोश्रीवर या तुम्हला कोणी रागावणार नाही, साहेब तुम्हाला पुन्हा सन्मानपूर्वक घेतील अशी भावनिक सादच खैरे यांनी सेनेच्या बंडखोर आमदारांना घातली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : फलटणच्या डॉक्टरने मुंबईत संपवलं आयुष्य, हातावर लिहिलेल्या मेसेजमध्ये केले गंभीर आरोप; वैद्यकीय अधीक्षक निलंबित

Maharashtra News Live Update:राहुल गांधी यांना सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाचे दिले जाणार निमंत्रण

Tea vs Coffee: चहा की कॉफी, आरोग्यासाठी सर्वात जास्त घातक काय? जाणून घ्या!

Auto Taxi Fares Increase: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, आजपासून रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागला; प्रति किमी किती रुपये मोजावे लागणार?

Heart Attack : पहिला हार्ट अटॅक आलाय? वेळीच व्हा सावधान! 'ही' १ चूक अन्...

SCROLL FOR NEXT