अभिजीत सोनवणे
नाशिक : नाशकात 15 ऑगस्टपासून पुन्हा हेल्मेटसक्ती Helmet लागू होणार आहे. मात्र या हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी जरा वेगळ्या पद्धतीने केली जाणार आहे. कारण दुचाकीचालकाने हेल्मेट परिधान केलेलं नसल्यास त्याला शहरातील पेट्रोलपंपावर पेट्रोल मिळणार नाही. नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी यासंदर्भात आदेश काढले असून नाशिकमध्ये Nashik हेल्मेटसक्तीचा मुद्दा पेटण्याची चिन्हं आहेत.
हे देखील पहा-
तुम्ही जर नाशिकमध्ये विनाहेल्मेट दुचाकी चालवत असाल, तर येत्या 15 ऑगस्टनंतर पेट्रोलपंपावर तुम्हाला पेट्रोल मिळणार नाही. कारण 15 ऑगस्टपासून नाशिक शहरात नो हेल्मेट, नो पेट्रोल No Helmet No Petrol मोहीम हेल्मेटसक्तीसाठी राबवली जाणार आहे. हेल्मेटअभावी रस्ते अपघातात अनेक दुचाकी चालकांचा मृत्यू होण्याच्या घटना घडत आहेत. हेल्मेटसक्ती लागू करूनही दुचाकी चालवताना अनेक नागरिक हेल्मेटचा वापर करतांना दिसत नाही. त्यामुळे नागरिकांचा हेल्मेट वापरण्याकडे कल वाढावा, यासाठी शहरात नो हेल्मेट नो पेट्रोल चा निर्णय लागू करण्याचा निर्णय पोलीस आयुक्तांनी घेतला आहे. त्यामुळे 15 ऑगस्टपासून दुचाकीचालकांनी हेल्मेट घातलेलं नसल्यास त्यांना पेट्रोलपंपावर पेट्रोल मिळणार नाही.
यासंदर्भात पेट्रोलपंप चालकांनी अद्याप आपली अधिकृत भूमिका जाहीर केलेली नसली, तरी या मुद्यावर मत मतांतरं पाहायला मिळत असून नागरिकांमध्येही याबाबत नाराजी पाहायला मिळतेय. हेल्मेटसक्तीबाबत नाशिककर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
याआधी शहरात हेल्मेटसक्ती लागू केली गेली, तेव्हाही या निर्णयाला मोठा विरोध करण्यात आला होता, त्यानंतर काही दिवसांनी हेल्मेटसक्तीची मोहीमही बाळगली. मात्र आता पुन्हा हेल्मेटसक्ती लागू करण्यात येत असून त्यातही हेल्मेट नसल्यास पेट्रोल मिळणार नसल्यानं येत्या काळात नाशकात हेल्मेटसक्तीचा मुद्दा पुन्हा एकदा पेटण्याची चिन्हं आहेत.
Edited By-Sanika Gade
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.