Court  Saam Tv
महाराष्ट्र

कोणतीच मुलगी अनोळखी मुलासोबत पहिल्याच भेटीत हॉटेल रूममध्ये जात नाही - कोर्ट

Nagpur High Court : ते फोटो अपलोड केले म्हणजे मुलाचे शारीरिक संबंध प्रस्थापित केले असे नाही, असे निरीक्षण नागपूर कोर्टाने नोंदवले.

Namdeo Kumbhar

Nagpur High Court : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या मुलाला निर्दोष ठरवले. त्याशिवाय, पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबियांनी व्यक्तीवर केलेल्या आरोपांवर शंका उपस्थिती केली.

विवेकबुद्धी असणाऱ्या कोणतीही मुलीगी पहिल्यांदा अनोळखी मुलाला भेटायला हॉटेलच्या खोलीत जाणार नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण बलात्कार आरोप प्ररणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदवले आहे. नागपूर कोर्टानं मुलीचा बलात्काराचा आरोप अमान्य करत आरोपीला सुनावलेली दहा वर्षांची शिक्षा रद्द करण्याचा निर्णय दिला.

नागपूर हायकोर्टानं बुधवारी बलात्काराच्या प्रकरणात महत्वाचे निरीक्षण नोंदवले. त्यासोबतच तरुणीचा आरोप अमान्य केला. तसेच मुलाला अचलपूर कोर्टाने सुनावेली शिक्षा रद्द करण्याचा आदेशही दिला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मुलीचा बलात्काराचा आरोप अमान्य करत मुलाला 10 वर्ष सुनावलेली शिक्षा रद्द करत महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवलं.

नेमकं काय प्रकरण -

राहुल लाहसे नावाच्या मुलांची फेसबुकवर एका मुलीशी मैत्री झाली होती. 2017 मध्ये अमरावती जिल्ह्यातील तरुणीला गावाजवळील हॉटेलमध्ये त्यानं भेटायला बोलावलं. त्यावेळी ती मुलगी 12 व्या वर्गात शिकत होती. हॉटेलमध्ये त्या मुलाने तिचा सोबत आक्षेपार्ह फोटो काढले, पण मैत्री तुटल्यानंतर ते फोटो फेसबुक आणि होणाऱ्या नवऱ्याला पाठवले.

त्यानंतर प्रकरण पोलिसात गेलं. अचलपूर कोर्टाने याप्रकरणात मुलाला दोषी ठरवत 10 वर्षांची शिक्षा सुनावली. मुलाने त्यानंतर या शिक्षेच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली.

निर्दोष सुटका का झाली?

नागपूर खंडपीठाने शिक्षा रद्द करत मुलाची निर्दोष सुटका केली. मुलीने सांगितलेली गोष्ट विश्वासहार्य नाही, फेसबुकवर मुलाने फोटो टाकल्यावर तक्रार दाखल करण्यात विलंब केला, फोटो अपलोड केले म्हणजे मुलाचे शारीरिक संबंध प्रस्थापित केले असे होत नाही. त्यामुळे संशयास्पद कथेचा आधारावर शिक्षा न देता निर्दोष सुटका केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : पुष्पा म्हणतो झूकेगा नाही साला, गद्दार म्हणतो उठेगा नाही साला - ठाकरेंचा शिंदेंना टोला

Shoking News : जेवणात मीठ कमी पडल्याने, गर्भवती महिलेला गमवावे लागले प्राण

Spiritual Shells: पैशाचा पाऊस पाडणारी कौरीची शेल कशी तयार होते? याचे महत्त्व काय आहे?

Dhule Tourism : वीकेंडसाठी धुळे परफेक्ट लोकेशन, 'ही' ३ ठिकाणं पाहताच आठवड्याचा थकवा जाईल पळून

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

SCROLL FOR NEXT