Mihan Project in Nagpur saam tv
महाराष्ट्र

'MIHAN' मध्ये सोयी सुविधांची वानवा, गुंतवणूक करण्यास कपंन्यांचा नकार, वाचा Saam TV चा सविस्तर रिपोर्ट

मिहान प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आलाय, कारण...

संजय डाफ

नागपूर : मिहानमधून टाटा संसचा एअरबस आणि फ्रांसचा सेफ्रॉन प्रकल्प इतरत्र गेल्यावर मिहान प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आलाय. मिहान मध्ये गुंतवणूक का होत नाही,असा प्रश्न निर्माण झालाय. योग्य सोयी सुविधा नसल्याने आणि प्रशासकीय नैराशाने मिहान प्रकल्प मागे पडतोय. मिहान मधील सध्याची स्थिती पाहिली तर या प्रकल्पात मोजक्या कंपन्यांचं काम सुरू आहे. मिहान प्रकल्पाचा ग्राउंड रिपोर्ट जाणून घ्या सविस्तर (Mihan project in nagpur latest news update)

नागपूर आणि विदर्भासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून मिहान म्हणजेच 'मल्टी मॉडेल इंटरनॅशनल कार्गो हब अँड एअरपोर्ट'आणि 'सेझ' म्हणजेच 'स्पेशल इकॉनॉमी झोन'प्रकल्पांकडे बघितलं जातं. 2002 मध्ये या प्रकल्पाला महाराष्ट्र शासनाने (Maharashtra Government) मंजुरी दिली होती. मिहानसाठी एकूण तीन हजार 56 एकर शेतजमीन संपादित करण्यात आली. या प्रकल्पात गुंतवणूक आली तर नागपूरात विकास होईल, रोजगार वाढेल,असा उद्देश होता.

मात्र,सुरुवातीपासूनच या प्रकल्पात गुंतवणूक करण्यास कंपन्यांची नापसंती आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांनी काही मोठे उद्योग मिहान मध्ये झाले खरे पण प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नैराशामुळं कंपन्यांना आकर्षित करण्यास अपयश येतं.

मिहानची नोडल एजन्सी असलेल्या महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुंबई बसून कारभार बघतात.'सेझ' मध्ये मार्केटिंग साठी फक्त एक कर्मचारी आहे.मनुष्यबळाचा मोठा अभाव आहे.त्यामुळं कंपन्यांचे प्रतिनिधी आल्यावर त्यांना मिहान मध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहित करण्यास हे अधिकारी कमी पडतात, अशी माहिती मिहान सेझचे विकास आयुक्त शर्मन रेड्डी यांनी दिली आहे.

अधिकारी रस घेत नसल्याने उद्योगांशी संबंधित संस्थांची एक समिती तयार करण्यात आलीय. या समीतीचे प्रतिनिधी मिहान मध्ये उद्योग यावेत यासाठी राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवण्याचं काम करतात. प्रमुख राजकीय नेत्यांना मिहान मध्ये उद्योग आणण्यास पाठपुरावा करण्याचं काम करतात, अशी प्रतिक्रिया मिहान समन्वय समितीचे सदस्य दीपेन अग्रवाल यांनी दिलीय.

मिहान आणि सेझ मध्ये 3 हजार 53 एकर जमीन आहे. 900 एकर जागा कंपन्यांनी घेतली. दोन हजारांवर जमीन अजूनही पडीत आहे.एकूण कंपन्यांची संख्या 101 आहे.यातील 37 कंपन्यांनी कामे सुरू केली नाहीत. 46 कंपन्यांचे काम सुरू आहे. 9 कंपन्यांनी नव्याने जमीन घेतली. मात्र काम सुरू नाही. पतंजली सारख्या उद्योग समूहाने काम सुरू न केल्याने 106 एकर जमीन परत घेतली जाणार आहे.

मिहानची सद्य स्थिती

मिहानमध्ये सध्या बीपीएस,टाटा उद्योग समूहाचा टाल आणि टीसीएस,लुपीन फार्मा आदी उद्योग सुरू झाले आहेत. याशिवाय येथे एअर इंडियाचे आणि एएआर-इंदमार टेक्निक्सची एकूण दोन विमान देखभाल दुरुस्ती केंद्रे (एमआरओ) सुरू आहेत. दसॉल्ट रिलायन्स एरोस्पेस लिमिटेडचे काम सुरू झाले आहे. कन्टेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि चा.(कॉन्कॉर)मल्टी-मोडल लॉजिस्टिक्स पार्क आहे. एचसीएल टेक्नालॉजीज लि.इन्फोसिस लि.ने गुंतवणूक केली आहे.

विशेष आर्थिक क्षेत्राबाहेर निवासी संकुले,वाणिज्यिक संकुल,माल साठवणूक केंद्रे विकसित करण्यात आली आहेत.तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक संस्था सुरू झाल्या आहेत.त्यात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स),भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम),राष्ट्रीय महाराष्ट्र विधि विद्यापीठ,शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय,डी.वाय.पाटील इंटरनॅशनल स्कूल आदींचा समावेश आहे.

एकीकडे मिहान मध्ये उद्योग येत नाहीत तर दुसरीकडे ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या त्यातील काहींची अजूनही योग्य मोबदला मिळाला नाही म्हणून ओरड आहे. काही शेतकरी अजूनही मिहान आपलं घर, जमीन सोडायला तयार नाही. एवढंच काय तर मिहान मध्ये अजूनही गुराढोरांचे गोठे बघायला मिळतात.नागपूरात नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे हेविवेट नेते आहेत.

दोघंही आपआपल्या परीने मिहान मध्ये उद्योग यावेत यासाठी प्रयत्न करीत आहेत.मात्र,त्यांना प्रशासनाची योग्य साथ मिळत नाही.मिहान प्रकल्पात गुंतवणूक आली तर नक्कीच नागपूर आणि विदर्भाचा विकास होईल.मात्र यासाठी राजकीय नेते आणि अधिकारी यांचा समन्वय आणि मिहान च्या योग्य मार्केटिंग ची गरज आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT