Andheri By-election: अंधेरी पोटनिवडणुकीत मतदारांचा अत्यल्प प्रतिसाद, सायंकाळी 5 वाजेपर्यंत फक्त 28.77 टक्के मतदान

शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ऋतुजा रमेश लटके या निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
Gujrat Election News
Gujrat Election NewsSaam TV

मुंबई : अंधेरी पोटनिवडणूक गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत होती. आज या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. मात्र मतदानाला मतदारांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाली आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत फक्त 28.77 टक्के मतदान झाले आहे. निवडणूक अटीतटीची वाटत असताना भाजपने आपला उमेदवार मागे घेतला होता. (Mumbai News)

आज सकाळी 7 वाजल्यापासून अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली. सायंकाळी 5 वाजेपर्यंत फक्त 28.77 टक्के मतदान झाले आहे. मतदानाला सुरुवात झाल्यानंतर सकाळी 11 वाजेपर्यंत 9.72 टक्के मतदान झालं. त्यानंतर दुपारी 1 वाजेपर्यंत 16.89 टक्के मतदान झालं. अशाच संथ गतीनं मतदान प्रक्रिया सुरु राहिली. 3 वाजता मतदानाची टक्केवारी 22.85 इतकी होती. तर पाच वाजेपर्यंत केवळ 28.77 टक्के मतदान झालं. सुट्टी जाहीर करुनदेखील मतदारांनी मदतानासाठी पाठ फिरवली. (Latest Marathi News)

Gujrat Election News
BJP Chitra Wagh : चित्रा वाघ यांच्याकडे भाजपकडून मोठी जबाबदारी, महत्वाचे पद मिळाल्यानंतर दिली पहिली प्रतिक्रिया

शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ऋतुजा रमेश लटके या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्यापुढे तूल्यबळ उमेदवार नाही. त्यामुळे त्यांचा विजय सोपा झालेला आहे. भाजपने सुरुवातीला मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली होती. परंतु मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून उमेदवार देऊ नये, असं आवाहन भाजपला केलं होतं. त्यानंतर शरद पवार यांनीदेखील भाजपने उमेदवार देऊ नये, अशी भूमिका घेतली. शेवटी भाजपने आपला उमेदवार मागे घेतला.

Gujrat Election News
PM Kisan Mandhan Yojana : सरकार देणार शेतकऱ्यांना दर महिन्याला पेन्शन; जाणून घ्या, वय व पात्रता

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत मतदारांनी इव्हीएमवरचा नोटा (NOTA) पर्याय निवडण्यासाठी पैसे दिले जात असल्याचा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने मंगळवारी केला होता. अनिल परब म्हटलं होतं की, त्यांच्या पक्षाने हा मुद्दा निवडणूक आयोगाबरोबरच पोलिसांकडेही उचलला आहे. तसेच आगामी बीएमसी निवडणुकीतही याचा प्रभाव पडेल. कारण पहिल्यांदाच महाविकास आघाडीची एकत्रित ताकद दिसून येणार आहे. यावेळी निवडणुकीत मतदानाच्या वेळा नोटा हा पर्याय निवडण्यासाठी लोकांना पैसे दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com