Sharad Pawar and Ajit Pawar Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: काकांनी कापले दादांचे परतीचे दोर? शरद पवारांच्या पक्षात अजित पवारांना नो एण्ट्री? बड्या नेत्याची साम टीव्हीला मोठी माहिती

Saam Tv Exclusive News: लोकसभेला फटका बसल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांच्या तंबूत परतायला सुरुवात झालीय. त्यातच अजित पवारही पुन्हा माघारी फिरण्याची चर्चा सुरु झाली.

Satish Kengar

भरत मोहोळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

लोकसभा निवडणूकीत 10 पैकी 8 जागा जिंकल्यानंतर शरद पवारांनी विधानसभेवर लक्ष केंद्रीत केलंय. त्यातच राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवारांसोबत गेलेल्या नेत्यांना पवारांनी प्रवेश द्यायला सुरुवात केलीय. त्यामुळे शरद पवार अजित पवारांनाही पुन्हा पक्षात घेणार का?

याची चर्चा रंगलीय. त्यापार्श्वभूमीवर शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने अजित पवारांना पक्षात नो एण्ट्री असल्याचं स्पष्ट केलंय. मात्र माघारी फिरण्याचा कोणताही विचार नसल्याचं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी स्पष्ट केलंय. ते म्हणाले आहेत की, आम्हाला बदनाम करण्यासाठी हे चाललंय. एकीकडे दादांच्या पक्षाने पवारांच्या पक्षाच्या नेत्याचा दावा फेटाळून लावलाय. मात्र दादांच्या पक्षातील नेत्यांनी पवारांच्या तंबूत प्रवेश करायला सुरुवात केलीय.

दादांचे शिलेदार, काकांच्या गळाला

दादांना सोडून निलेश लंकेंनी (Nilesh Dnyandev Lanke) तुतारी फुंकली आहे. तर बजरंग सोनवणेंनी लोकसभेपूर्वी तुतारी फुंकली फुंकली. पिंपरी चिंचवडच्या (Pimpri-Chinchwad) अजित गव्हाणे पवारांच्या तंबूत परतले. भाग्यश्री आत्रामही पवारांच्या पक्षात दाखल झाल्या. के. पी पाटील आणि ए. वाय पाटील पवारांच्या पक्षात परतले आहेत. विलास लांडे पवारांच्या तंबूत परतण्याची शक्यता आहे. अतुल बेनकेही दादांना सोडण्याची शक्यता आहे. राजेंद्र शिंगणेंकडूनही दादांना सोडण्याचे संकेत दिलेत.

लोकसभेला पवारांच्या पक्षाने मुसंडी मारली तर अजित पवार महायुतीत एकटे पडत असल्याची चर्चा रंगलीय. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अजित पवार जाहीर सभांमधून चूक झाल्याची कबुली देताहेत. एवढंच नाही तर शरद पवारांविषयी अजित पवारांची भूमिकाही सौम्य केलीय.

गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांचा बदलेला नूर आणि सूर पाहता पवारांच्या पक्षाकडून अजित पवारांना परतीचे दरवाजे बंद असल्याचं म्हटलंय..त्यामुळे खरंच अजित पवार परत जाण्याचा प्रयत्न करताहेत की फक्त चर्चांना हवा दिली जातेय? याची उत्सुकता लागलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

Bigg Boss 6: दिपाली सय्यद ते राकेश बापट; कोण-कोण आहे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये? वाचा सविस्तर यादी

Uddhav Thackeray: भाजपचा मुंबईला परत बॉम्बे करायचा डाव; शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

SCROLL FOR NEXT