Mumbai No Water Shortage
Mumbai No Water Shortage Saam TV
महाराष्ट्र

Mumbai No Water Shortage : मुंबईमध्ये पाणीपुरवठा कपात नाही; धरणात किती पाणीसाठा शिल्लक?

Ruchika Jadhav

Mumbai Dam Levels :

जून ते सप्‍टेंबर २०२३ दरम्‍यान झालेल्‍या कमी पर्जन्यमानामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा गत वर्षीच्या तुलनेने कमी झाला आहे. पाणीसाठा कमी झाल्याने मुंबईकरांना पाणीकपात होईल अशी भीती होती. मात्र पाणीसाठा कमी असला तरी मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्यात कोणताही परिणाम होणार नाहीये. राज्‍य शासनानेदेखील मुंबईसाठी ‘निभावणी साठ्या’तून पाणी उपलब्‍ध करून दिले आहे.

सद्यस्थितीत मुंबईकरांच्‍या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा कुठलाही मानस नाही. येत्‍या पावसाळ्यापर्यंत पुरेसा पाणीपुरवठा होईल. अशारितीने नियोजन केलेले आहे, असे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत स्पष्ट करण्यात येत आहे.

बृहन्‍मुंबई महानगरपालिका मुख्‍यालयात आज (दिनांक २६ मार्च २०२४) झालेल्या उच्‍चस्‍तरीय बैठकीत पाणीपुरवठ्याचा आढावा घेण्‍यात आला. धरणातील उपलब्‍ध पाणीसाठ्यावर महानगरपालिका प्रशासन बारकाईने लक्ष ठेऊन आहे.

राज्‍य शासनानेदेखील निभावणी साठ्यातून महानगरपालिकेस पाणीपुरवठा करण्याचे यापूर्वीच मान्‍य केले आहे. सद्यस्थितीत पाणीकपात करण्‍याचा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा कोणताही प्रस्‍ताव नाही.

मुंबईकरांना विनंती करण्यात येते की, पाण्याचा जपून आणि काटकसरीने वापर करावा आणि बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

किती पाणीसाठा शिल्लक?

मुंबईला उर्ध्व वैतरणा, तानसा, मोडक सागर, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या धरणातून पाणीपुरवठा केला जातो. सध्या या धरणात केवळ ३२.३२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मुंबईला रोज ३,८०० दशलक्ष लिटर पाणीपाणीपुरवठा केला जातो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report : ठाकरेंचा, शिंदेंचा की तिसराच शिलेदार गुलाल उधळणार? अशी आहेत पालघरची राजकीय समीकरणे..

Special Report : मुख्यमंत्री शिंदे तडीपार होणार? संजय राऊत असं का म्हणाले?

Sonali Bendre: सुंदर, स्टायलिश, सौंदर्यवती सोनाली.. पाहा खास फोटो

Special Report : पवारांनी पवारांवर अन्याय केला? अजित पवारांचे काय आरोप?

Today's Marathi News Live : काँग्रेस उमेदवाराकडून 'घड्याळ' चिन्ह वापरत आचारसंहितेचा भंग

SCROLL FOR NEXT