Tata Airbus Project : वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पानंतर आता नागपूरमध्ये होणारा टाटा एअरबस हा मोठा प्रकल्प गुजरातला (Gujarat) गेल्यामुळे राज्यभरातून शिंदे-फडणवीस सरकार विरोधात नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. विरोधकांनी तर शिंदे सरकारवर सडकून टीका करायला सुरुवात केली आहे. तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून तर राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.
अशातच आता एक मोठी माहिती समोर आली आहे ती म्हणजे टाटा एअरबस हा प्रकल्प नागपूरमध्ये (Nagpur) व्हावा यासाठी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी (Nitin Gadkari) आग्रही होते. यासाठी त्यांनी टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखर यांना यांना एक पत्र देखील लिहीलं होतं अशी माहिती समोर आली आहे.
पाहा व्हिडीओ -
या पत्रात त्यांनी नागपूरात साकारण्याचा प्रस्ताव असणारा टाटा एअरबसचा प्रकल्प हा नागपूर परिसरात टाटा समुहाच्या विस्तारीत योजनांसाठी फायद्याचं ठरेल असं म्हटलं होतं. शिवाय नागपूर टाटा समुहाचं हब बनवण्याची विनंती देखील गडकरी यांनी टाटा कंपनीला केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता खुद्द गडकरी या प्रकल्पासाठी आग्रही असताना देखील महाराष्ट्रात होणारा हा प्रकल्प गुजरातला का गेला याबाबत तर्क वितर्क लढविले जात आहेत.
शिवाय या प्रकल्पाच्या मुद्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील राज्यसरकारवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रातील सत्तांतर राज्याला वेठीस धरण्यासाठी झाले आहे का ? असा प्रश्न सध्या पडत आहे. गुजरात निवडणुकांच्या अनुषंगाने सर्व प्रकल्प गुजरातला नेले जात आहेत आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री मात्र बघ्याच्या भूमिकेत आहे. आमचा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवणार आहात ? असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.