Cabinet Expansion Buzz Amid Nitin Gadkari’s Remark on Giving Youth a Chance 
महाराष्ट्र

'आता मी जास्त काम करु शकत नाही, नव्या पिढीला संधी द्यायला हवी'; गडकरींच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या

BJP Minister Nitin Gadkari Statement : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ‘आता मी जास्त काम करू शकत नाही, नव्या पिढीला संधी द्यायला हवी’ या वक्तव्यामुळे त्यांच्या राजकीय भवितव्याबाबत चर्चांना वेग आला आहे.

Bharat Jadhav

  • नितीन गडकरींच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

  • ‘नव्या पिढीला संधी दिली पाहिजे’ असं गडकरींनी म्हटलं.

  • काटोल तालुक्यातील पारडसिंगा येथील कार्यक्रमात गडकरींनी हे वक्तव्य केलं.

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चांना वेग आला असतानाच परिवहन आणि रस्ते बांधणी मंत्री नितीन गडकरींनी एक विधान केलंय. ‘आता मी जास्त काम करू शकत नाही, नव्या पिढीला संधी दिली पाहिजे’, असं केंद्रीय मंत्र्यांनी वक्तव्य केलंय, त्यामुळे राजकीय वर्तुळात नितीन गडकरी राजकारणातून निवृत्ती घेणार असल्याची चर्चा सुरू झालीय.

नितीन गडकरी हे एकलव्य एकल विद्यालय शिक्षक-पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्गाच्या समारोपाच्या कार्यक्रमात बोलत होते. काटोल तालुक्यातील पारडसिंगा येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना गडकरींनी राजकीय भवितव्याबाबत विधान केलंय. शिक्षक-पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्गात मार्गदर्शन करताना त्यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांना निरोगी आरोग्य करण्याचा सल्ला दिला.आपणही दररोज अडीच तास योगासन करतो. विद्यार्थ्यांनीही योगासन केलं पाहिजे, मिळालेलं आयुष्य उत्तम जगलं पाहिजे.

इतरांचं आयुष्य चांगलं करण्यासाठी आपण काम केलं पाहिजे. हे काम म्हणजे, सामाजिक दायित्व, हेच काम म्हणजे राष्ट्रीय जबाबदारी असा सल्ला दिला. त्याचवेळी त्यांनी राजकीय जीवनाबाबत एक मोठं विधान केलंय. पक्षाचं काम करताना पूर्वी समोसा खाऊन झोपायचो, कुठलीही शिस्त नव्हती. मात्र कोरोना काळानंतर जीवनशैलीत बदल केला असून दररोज योगासन करतो. तब्येत चांगली असेल तरच आयुष्याचा आनंद घेता येतो.

तब्येत चांगली नसेल तर सत्ता काही कामाची नाही, असं म्हणताना त्यांनी आपण जास्त काम करू शकत नाही, नव्या पिढीला संधी दिली पाहिजे’. नव्या पिढीला नवी जबाबदारी दिली पाहिजे, असंही गडकरी म्हणाले. नितीन गडकरी यांनी नव्या पिढीला प्रोत्सहन देताना हे विधान केलं असलं तरी त्यांनी निवृत्तीचे संकेत दिलेत अशी चर्चा राजकीय वर्तुळ मात्र त्यांच्या निवृत्तीची चर्चा सुर झालीय.

इथेनॉलच्या हट्टाने नितीन गडकरी अडचणीत

नितीन गडकरी हे पेट्रोलमध्ये इ-२० इथेनॉलचे मिश्रण करण्याच्या धोरणामुळे अडचणीत आलेत. त्यांच्यावर सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे. भारतात २०टक्के इथेनॉल आणि ८०टक्के पेट्रोल यांच्या मिश्रणाला (E20) विरोध होत आहे. विशेष म्हणजे २०२३ पूर्वी उत्पादित केलेल्या पेट्रोल वाहनांचे मालक याबद्दल चिंतेत आहेत. त्यांच्या मते, या इंधनामुळे वाहनाचे मायलेज कमी होत आहे, तसेच वाहनांच्या देखभालीचा खर्च वाढतो आणि इंजिनचे भाग अकाली निकामी होतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: मराठी बोलणार नाही..., मुंबईत रिक्षाचालकांची दादागिरी; २० मिनिटं रस्ता रोखून धरला

हॉटेल स्टाइल फरफरीत भात बनवण्यासाठी तांदूळ किती वेळा धुवावे? पाणी किती असावं, जाणून घ्या जबरदस्त पद्धत

Ideal Weight by Age: तुमचं वजन योग्य आहे का? १८ ते ६० वयापर्यंत वयानुसार जाणून घ्या किती असावे वजन

Maharashtra News Live Update: गणेश मंडळ आणि महापालिकेच्या बैठकीत गोंधळ

IAS Transfer: मोठा प्रशासकीय फेरबदल! १७ आयएएस अधिकाऱ्यांच्या मध्यरात्री तडकाफडकी बदल्या; कुणाची कुठे पोस्टिंग?

SCROLL FOR NEXT