Nitin Gadkari  Saam Tv
महाराष्ट्र

IAS अधिकारी झालात मग तुम्ही सरकार चालविण्याचा ठेका घेतला का? गडकरींकडून कर्मचाऱ्यांची कानउघडणी

Nitin Gadkari In Nagpur: महामार्गासाठी जमीन हस्तांतरण करण्याची परवानगी हवी असेल तर ते सरकारी कर्मचाऱ्यांकडून लवकर होत नाही. परंतु त्या जागी कंत्राटदाराला दिलं तो अवघ्या १५ दिवसात परवानगी घेऊन येत असतो, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणालेत.

Bharat Jadhav

पराग ढोबळे, साम प्रतिनिधी

नागपूर: IAS अधिकारी स्वतःला सगळ्या विषयाचे ज्ञानी समजून सरकार स्वतः चालवत असल्याचा आव आणतात, असे खडेबोल नितीन गडकरींनी सुनावलेत. ते जैन समाजातील उद्योजकांचा महाकुंभ कार्यक्रमात बोलत होते.

नागपूरात तीन दिवसीय जैन समाजातील उद्योजकांचा महाकुंभ कार्यक्रमाच आयोजन करण्यात आले आहे. त्याप्रसंगी बोलतांना गडकरी यांनी नागपूर महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांची कान उघडणी केली. 'आमचे IAS अधिकाऱ्यांना मी मस्करीत म्हणतो, तुम्ही सगळ्याच विषयाचे ज्ञानी आहेत. मंत्री लोकांना तुम्ही काय समजता, आम्ही अंगुठा छाप आहोत? तुम्ही IAS अधिकारी असल्याने तुम्ही सरकार चालविण्याचा ठेका घेतला आहे का? प्रॉब्लेम आहे की कोणी एक विषयात तज्ञ असू शकतो १० विषयांचा नसतो, असं गडकरी म्हणाले.

यावेळी नितीन गडकरी यांनी एका कंत्राटदारासोबत झालेल्या चर्चेचा किस्सा सांगितला. हाफिज नामक काँट्रॅक्टरला नागपूर महानगर पालिकेचा बनवून त्याला सांगितलं की, नागपूर महानगर पालिकेत इतक्या नालायक माणसांसोबत काम करण्याच तुला प्रशिक्षण दिलं. मुर्दाड सिस्टमसोबत काम करण्याचा प्रशिक्षण दिलं. तू जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जाऊन यशस्वी काम करू शकतो, अस म्हणत अधिकाऱ्यांना सुनावलं.

आपली स्पर्धा चायनासोबत आहे. चायना आपल्यापेक्षा १५ वर्ष पुढे आहे. आपल्याला पुढील पाच वर्षात चायनासोबत स्पर्धा करणे शक्य आहे, हे कठीण नाही. जपानला मागे टाकून आता ऑटोमोबाईल इंडस्ट्री जगात तिसऱ्या नंबरवर आहोत. लवकरच पहिल्या क्रमांकावर जाऊ. परवानगी घेण्यासाठी पण अनेक अडचणींनाचा सामना करावा लागतो, परंतु मला त्यावर बोलायचं नसल्याचं गडकरी म्हणालेत.

सरकारी कर्मचारी परवानगी मिळविण्यासाठी वर्ष घालवतात त्याचा परिणाम प्रकल्प किंमत वाढण्यावर होतो. ज्याला कॉन्ट्रॅक्ट दिले त्यालाच इतर परवानगी आणायला आदेश मी संचालकांना दिले. ते म्हणाले कसं शक्य आहे, कंत्राटदार चहा पाणी पाजेल, रात्री जेवण भोजन देईल, १५ दिवसांत परवानगी आणेल काही गोष्टी मनाला पटतात काही पटत नाही, असं गडकरी म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News: कल्याण डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा! पलावा पुल आजपासून नागरिकांसाठी सुरू|VIDEO

Sanjay Raut : हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर संजय राऊतांची तिखट प्रतिकिया

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे वर्षभरात एकूण किती मिळाले पैसे?

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

Kalyan- Shilphata Road: कल्याण-डोंबिवलीकरांची ट्रॅफिकमधून सुटका, पलावा पूल आजपासून सुरू

SCROLL FOR NEXT