Siddhi Hande
साखरपुडा हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण असतो. या दिवशी नवरा- नवरी एकमेकांच्या हातात अंगठी घालतात.
साखरपुड्याची अंगठी ही खूप स्पेशल असते. ही अंगठी आयुष्यभर सोबत असते. त्यामुळे या अंगठीची डिझाइनदेखील स्पेशल असायला हवी.
तुम्ही तुमच्या पार्टनरच्या नावाच्या पहिले अक्षर तुमच्या अंगठीत कोरुन घेऊ शकतात. ही वेगळीच आठवण असेल.
तुम्ही काहीतरी वेगळं म्हणून प्लॅटीनमची अंगठी ट्राय करु शकतात. त्यात सिंपल सोबर डिझाइन सुंदर दिसेल.
तुम्ही हृदयाच्या आकाराची डिझाइन असलेली अंगठी निवडू शकतात. ही अंगठी खूप सुंदर दिसेल.
सध्या इनफिनिटी डिझाइन असलेली अंगठीचा ट्रेंड सुरु आहे. ही अंगठीदेखील खूप सुंदर दिसते.
डायमंड रिंग नवरा-नवरीच्या हातात शोभून दिसेल. त्या अंगठीवर पूर्णपणे डायमंड वर्क असेल तर आणखीनच सुंदर दिसेल.
कपल एकमेकांसारखी मॅचिंग अंगठी घेऊ शकतात. त्यामुळे दोघांच्याही हातात एकसारखी रिंग दिसेल.
तुमच्या अंगठीवर डायमंडच्या फुलाची डिझाइन असेल ते खूपच सुंदर डिसेल. रिंग सोन्याची त्यावर डायमंडचे वर्क असल्यावर खूप सुंदर दिसेल.