Shruti Vilas Kadam
कुनाफा सेवई, ताज्या स्ट्रॉबेरी, बटर, साखर, पाणी, वेलची पूड, दूध, कंडेन्स्ड मिल्क, क्रीम चीज किंवा खवा.
पातेल्यात साखर आणि पाणी उकळवून घट्ट पाक तयार करा. गॅस बंद केल्यावर वेलची पूड घालून बाजूला ठेवा.
कुनाफा सेवई बारीक करून त्यात वितळलेले बटर मिसळा. कढईत हलक्या आचेवर सुवास येईपर्यंत भाजा.
स्ट्रॉबेरीचे छोटे तुकडे करून त्यात थोडी साखर घालून २–३ मिनिटे शिजवा, जेणेकरून थोडी मऊ होतील.
भाजलेल्या कुनाफ्याचा अर्धा भाग साच्यात पसरवा, त्यावर क्रीम चीज/खवा आणि स्ट्रॉबेरी फिलिंग ठेवा.
उरलेला कुनाफा वर पसरवून ओव्हनमध्ये १८०°C तापमानावर १५–२० मिनिटे बेक करा (किंवा कढईत झाकण ठेवून शिजवा).
गरम कुनाफ्यावर तयार केलेला पाक ओता. वरून ताज्या स्ट्रॉबेरीने सजवा आणि गरमागरम सर्व्ह करा.