ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मकर संक्रांतीला पारंपरिक लूकसाठी काळी पैठणी साडी खूपच लोकप्रिय आहे. सोन्याची जर, मोराची नक्षी आणि रेशमी काठ सणाला शोभून दिसतो.
रॉयल लूकसाठी ब्लॅक बनारसी साडी एक बेस्ट पर्याय आहे. जड ब्रोकेड डिझाइन आणि गोल्डन वर्क असलेली साडी संक्रांतीच्या कार्यक्रमासाठी परफेक्ट दिसते.
कॉटन साडी ही घालण्यास हलकी असते. हलकी असल्यामुळे ब्लॅक कॉटन साडी दिवसभर घालण्यासाठी योग्य आहे. रंगीबेरंगी ब्लाऊजसोबत तुम्ही साडी नेसू शकता.
ब्लॅक सिल्क साडीमुळे सणासुदीला एलिगंट आणि क्लासी लूक येतो. गोल्डन बॉर्डर संक्रांतीला खास शोभा आणते.
फ्लोरल किंवा ट्रेडिशनल असलेली ब्लॅक प्रिंटेड साडी तरुणींमध्ये खूप ट्रेंडिंग आहे. यावर ऑक्साईडचे हलके दागिने घातले तर लूक उठून दिसतो.
चंदेरी फॅब्रिकमुळे साडीला हलकी चमक मिळते. ब्लॅक चंदेरी हे कॉमबिनेशन सुंदर दिसते. हि साडी तुम्ही संक्रांतीच्या पूजेसाठी आणि हळदी-कुंकूसाठी नेसू शकता.
वारली पेटिंग आधारित टेम्पल बॉर्डर असलेली ब्लॅक साडी पारंपरिक सणासाठी खास मानली जाते.
ब्लॅक रंगातील माहेश्वरी साडी संक्रातीला एकदम उठून दिसते. या साडीवर तुम्ही वेगवेगळे दागिने घालू शकता.
ब्लॅक साडीवर तुम्ही वेगवेगळे रंगीत ब्लाऊज, हिरव्या किंवा मॅचिंग बांगड्या, नथ आणि गजरा वापरल्यास मकर संक्रांतीचा ट्रेडिशनल लूक अधिक छान दिलण्यास मदत होईल.