Nitin Deshmukh saam tv
महाराष्ट्र

Nitin Deshmukh : ठाकरेंच्या आमदार पुत्रावर प्राणघातक हल्ला, सराईत गुन्हेगारांकडून बेदम मारहाण

Balapur Assembly constituency : नितीन देशमुख यांचे सुपुत्र पृथ्वी देशमुख यांच्यावर काही सराईत गुन्हेगारांनी अकोल्यात हल्ला केलाय. बाळापूरमध्ये तणावाचे वातवरण निर्माण झालेय.

Namdeo Kumbhar

अक्षय गवळी, अकोला, साम टिव्ही प्रतिनिधी

Nitin Deshmukh MLA : उद्धव ठाकरे गटाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांचे सुपुत्र पृथ्वी देशमुख यांच्यावर काही सराईत गुन्हेगारांनी अकोल्यात हल्ला केलाय. अकोला शहरातील सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना आहे. पृथ्वी देशमुख हा कपड्याच्या दुकानावर उभा असताना काही सराईत गुन्हेगारांनी त्याला अडवून त्याच्यावर प्राण घातक हल्ला केला. या हल्लादरम्यान सराईत गुन्हेगारांकडून पृथ्वी देशमुखला बेदम मारहाण झाली.

आमदार नितीन देशमुख यांच्या मुलावर हल्ला झाल्याची माहिती मिळतात ठाकरे गटाचे शिवसैनिक मोठ्या संख्येने पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. देशमुखांच्या मुलावर हल्ला करणारे सर्व जण कृषी नगर भागातील रहिवासी असल्याचे प्राथमिक माहितीमधून समोर आलेय. पृथ्वी देशमुख याच्यावर हल्ला का केला? याबाबत बाळापूरमध्ये सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

पोराला सराईत गुन्हेगारांकडून बेदम मारहाण झाल्यानंतर तक्रार दाखल करण्यासाठी स्वतः आमदार नितीन देशमुख आणि शिवसैनिक पोलिस ठाण्यात पोचले आहेत. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.. वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत..

दरम्यान, 30 मिनिट पोलिसांत कोणीही नव्हतं, सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून गुन्हे वाढतायात.. पोलीस ठाण्यात हजर राहत नाहीत, आज माझ्या मुलावर चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न केला.. त्याने पळ काढल्याने पुढील टळलाये.. असेही आमदार नितीन देशमुख यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली. पण आमदार पुत्राला मारहाण झाल्याची चर्चा बाळापूर मतदारसंघात होत आहे. पोलीस याप्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blood Pressure Control : ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी किती वेळ चालणं योग्य? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

Health Care: रोज भात खाल्ल्याने वजन वाढते का? डॉक्टरांनी सांगितलं खरं कारण

Shraddha Kapoor - Eetha Video : श्रद्धा कपूरच्या 'ईथा'चा अंगावर काटा आणणारा टीझर, कोण होत्या विठाबाई नारायणगावकर?

Train weight distribution: अनेक टन वजन असलेल्या ट्रेन धावूनही रेल्वेचे रूळ तुटत कसे नाहीत?

Irregular meal timings: दररोज वेगवेगळ्या वेळेस जेवल्याने पोटावर काय परिणाम होतो? तज्ज्ञांनी सांगितली महत्त्वाची बाब

SCROLL FOR NEXT