Nitesh Rane विनायक वंजारे
महाराष्ट्र

नितेश राणेंना कणकवलीत येण्यास मुभा, मात्र गावात लागले निषेधाचे बॅनर (पहा Video)

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विनायक वंजारे -

सिंधुदुर्ग : कणकवली (Kaṇakavali) तालुक्यातील करंजे गावात ग्रामपंचायतीच्या बाहेर लागलेला बॅनर सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. करंजे ग्रामपंचायती बाहेर संतोष परब (Santosh Parab) हल्ला प्रकरणातील आरोपी व षडयंत्र रचणाऱ्याचा निषेध करणारा फलक अज्ञातांनी लावला आहे.

या बॅनरवर संतोष परब यांच्या जखमा दाखवणारा व वृत्तपत्रातील कात्रणांचे फोटो या बॅनर वर लावण्यात आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे या प्रकरणातील संशयीत आरोपी नितेश राणे (Nitesh Rane) आणि गोट्या सावंत यांना कालचं न्यायालयाकडून कणकवली प्रवेशास मुभा मिळालेली असताना लागलीच हा बॅनर लावण्यात आला. त्यामुळे या बॅनरची सर्वत्र चर्चा आहे.

पहा व्हिडीओ -

करंजे गावच्या (Karanje village) सरपंचांना हा बॅनर कोणी लावला हे माहीत नाही मात्र गावातील वातावरण दूषित करण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ग्रामपंचायती बाहेरचा बॅनर हटविण्यासाठी संतोष परब यांना नोटीस दिली असून त्यांनी ती स्वीकारली नाही. मात्र ग्रामपंचायत आता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार पंच यादी घालून बॅनर काढणार असल्याची माहीती सरपंचानी दिली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahad News : बिल थकविल्याने विज पुरवठा केला खंडीत; महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

EPFO: UAN नंबर विसरलात? टेन्शन सोडा, या सोप्य स्टेप्स फॉलो करुन जाणून घ्या

Jalna Accident: ब्रेकिंग! जालन्यात बस- ट्रकचा भीषण अपघात; ५ ते ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

iPhone 16 चा सेल सुरू, 67500 रुपयांपर्यंतची ऑफर; किंमत, ऑफर आणि खरेदीचे ठिकाण वाचा सर्वकाही

SCROLL FOR NEXT