(राजेश भोस्तेकर)
रायगड : सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीतील प्रचार प्रमुख संतोष परब हल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांना अटक होणार असल्याने जिल्ह्यातील वातावरण तापले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी रायगड पोलीस (Police) दल काल 27 डिसेंबर रोजी रवाना झाले आहे. (Nitesh Rane Issue Raigad Police in Sindhudurg)
यामध्ये अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक, गृह उपविभागीय अधिकारी यांच्यासह सह अधिकारी आणि 50 पोलीस कर्मचारी हे सिंधुदुर्ग पोलिसांच्या मदतीला दाखल झाले आहेत. अशी माहिती रायगड जिल्हा पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे पडघम वाजले असताना शिवसेनेचे (Shivsena) संतोष परब याच्यावर हल्ला झाला आहे. या प्रकरणात आमदार नितेश राणे (Nitesh Rane) याचे नाव आले असल्याने त्यांना अटक करण्यासाठी शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आले होते. आमदार नितेश राणे यांनी अटक पूर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला असून आज दुपारी सुनावणी होणार आहे.
या प्रकरणामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वातावरण ढवळले आहे. त्याचबरोबर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. यासाठी कोकण विभागाचे महानिरीक्षक हे सिंधुदुर्ग मध्ये ठाण मांडून असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रायगडातूनही जादाची कुमक मागविण्यात आली आहे. जिल्ह्यातील 6 अधिकारी आणि 50 कर्मचारी पथक हे सिंधुदुर्गात दाखल झाले आहे.
Edited By - Amit Golwalkar
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.