'दिल्लीस पळून गेले.., कसं शक्य आहे? कोंबडीच्या पंखात एवढं बळ नसतं'

आमदार राणेंना अटक करावी या मागणीसाठी शिवसेनेने साेमवारी पाेलिस ठाण्यावर माेर्चा काढला हाेता.
prashant jagtap & nitesh rane
prashant jagtap & nitesh rane
Published On

सातारा : सिंधुदुर्ग (sindhudurg) जिल्हा न्यायालयात आमदार नितेश राणे (nitesh rane) यांच्या वकीलांनी राणेंच्या अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल आहे. त्याची सुनावणी आज (मंगळवार) सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात दुपारच्या सत्रात हाेणार आहे. दरम्यान रविवारपासून नितेश राणे हे गायब असल्याने ते अटकेच्या भितीने पळून गेले असावेत असा अंदाज विराेधकांकडून बांधला जात आहे. शिवसेनेने तर कणकवलीत आमदार राणेंना अटक करावी या मागणीसाठी साेमवारी पाेलिस ठाण्यावर माेर्चा काढला हाेता.

सिंधुदुर्ग (sindhudurg) जिल्हा बँक निवडणुकीमुळे पुन्हा एकदा राणे विरुद्ध शिवसेना (shivsena) असं वातावरण जिल्ह्यात तापू लागलेले आहे. संतोष परब यांच्या हल्ल्यासंदर्भात सहा संशयित आरोपी पकडल्याची माहिती साेमवारी पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी दिली. परंतु दाभाडेंनी आमदार नितेश राणे (nitesh rane) यांच्याबाबत काहीच माहिती दिली नाही.

prashant jagtap & nitesh rane
नाद खूळा! महिला पोलिस कॉन्स्टेबलने केले अजित पवारांचे सारथ्य

नितेश राणे देखील गेले तीन दिवस कूठेच दिसत नसल्याने विराेधकांना त्यांच्यावर टीका करण्यासाठी आयती संधी चालून आहे. राष्ट्रवादीचे (ncp) पुणे शहरध्यक्ष आणि माजी महापाैर प्रशांत जगताप (prashant jagtap) यांनी राणेंचे नाव घेता एक ट्विट केले आहे.

लोकांना वाटतंय ते दिल्लीला पळून गेले...

कसं शक्य आहे ?

कोंबडीच्या पंखात एवढं बळ नसतं

जगताप यांच्या ट्विटवर काहींनी प्रतिसाद देत थेट राणेंवर शाब्दिक हल्ला चढविला आहे.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com