Nitesh Rane, Sanjay Rane Saam Tv
महाराष्ट्र

...तर आजची सकाळ खराब झाली नसती; नितेश राणेंचा संजय राऊतांवर हल्लाबोल

आज सकाळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी ईडीने धाड टाकली. यावर आता राज्यातून प्रतिक्रिया येत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विनायक वंजारे

सिंधुदुर्ग - आज सकाळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी ईडीने धाड टाकली. ईडीची (ED) चौकशी अजुनही सुरू आहे. यावर आता राज्यातून प्रतिक्रिया येत आहेत. यावर आता नितेश राणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांच्यावर टीका करत नितेश राणे (Nitesh Rane) म्हणले की, संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडी मार्फत 3 वेळा नोटीस देण्यात आली होती. मात्र या महाशयांनी तिन्ही वेळा वेगवेगळी करणे दिली आणि पळ काढला संजय राउत हे पळकुटे व्यक्ती आहेत.

हे देखील पाहा -

तुम्ही जर काही केलं नसेल पत्रा चाळ घोटाळ्यात तुमचा काही सबंध नसेल तर तुम्ही तीन तीन वेळा ईडी चौकशी का चुकवता बाळासाहेबांची शपथ घेण्यापेक्षा जर तुम्ही इडीला सत्य सांगितलं असत तर आजची सकाळ खराब झाली नसती. तुम्ही दररोज येऊन महाराष्ट्राची सकाळ खराब करत होता आज तुमची सकाळ खराब झाली स्वप्ना पाटकर च्या ऑडिओ क्लिप मध्ये ती जमीन माझ्या किंवा प्रवीण राऊत याच्या नावावर कर असे संजय राऊत सांगत आहेत.

तर मग आता आरोप सिद्ध करायची गरज आहे का? संजय राऊत हे शरण जाणार नाही असे म्हणत आहेत मात्र ही घाण कोणत्याही पक्षाला नको आहे. अशी टिकाही नितेश राणेंनी संजय राऊत यांच्यावर केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

नोकरीचा राजीनामा देताय? तुम्हाला या गोष्टी माहितीच हव्यात

Sprouts Usal Recipe: जेवणासाठी बनवा खास पौष्टिक मिक्स कडधान्यांची उसळ; सोपी रेसिपी लगेच करा ट्राय

Gulab Kulfi Recipe: उन्हाळ्यात घरच्या घरी बनवा क्रीमी आणि स्वादिष्ट गुलाब कुल्फी, वाचा सोपी रेसिपी

LPG Gas Cylinder : आता रांगेत उभे राहायची गरज नाही ; घरबसल्या ५ मिनिटांत करा एलपीजी कनेक्शन बंद, पैसेही परत मिळतील

SCROLL FOR NEXT