Surabhi Jayashree Jagdish
नवीन आणि चांगली नोकरी मिळाल्यानंतर सध्याच्या कंपनीतून बाहेर पडताना फक्त राजीनामा देणं पुरेसं नसतं, तर काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं. अनेक वेळा आपण घाईत काही महत्त्वाची कागदपत्रे विसरतो. अशावेळी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत े पाहूयात
राजीनामा दिल्यानंतर तुमचं Form 16 योग्य प्रकारे मिळालं आहे का याची खात्री करून घ्या. हे डॉक्युमेंट आयकर रिटर्न भरताना खूप महत्त्वाचं असतं. जर वर्षाच्या मध्यात जॉब बदलत असाल तर दोन्ही कंपन्यांचे Form 16 घेणं आवश्यक आहे.
तुमच्या PF अकाउंटची माहिती आणि UAN नंबर अपडेट आहे का हे तपासा. नवीन कंपनीत जॉईन होताना PF ट्रान्सफर करणं किंवा जुना PF काढणं याची माहिती घ्या. EPFO पोर्टलवर लॉगिन करून सर्व डिटेल्स अचूक आहेत का ते नक्की तपासून घ्या.
जर तुम्ही कंपनीमध्ये 5 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ काम केलं असेल तर तुम्हाला ग्रॅच्युटी मिळण्याचा अधिकार आहे. HR कडून ग्रॅच्युटी किती मिळेल आणि ती कधी मिळेल याची स्पष्ट माहिती घ्या.
राजीनामा देताना HR शी स्पष्ट आणि प्रोफेशनल पद्धतीने संवाद साधा. तुमच्या शेवटच्या कामाच्या दिवसाबद्दल, पेंडिंग सॅलरी आणि इतर फायद्यांबद्दल चर्चा करा. भविष्यात रेफरन्ससाठी चांगलं रिलेशन ठेवणं खूप महत्त्वाचं असतं.
तुमच्याकडे असलेलं काम योग्य व्यक्तीकडे व्यवस्थित हँडओव्हर करा. सर्व फाइल्स, पासवर्ड्स आणि प्रोजेक्टची माहिती डॉक्युमेंट करून द्या. यामुळे तुमच्या प्रोफेशनल इमेजवर पॉझिटीव्ह इफेक्ट पडतो.
कंपनीच्या नियमांनुसार नोटीस पिरीएड पूर्ण करणं आवश्यक आहे. जर तुम्हाला लवकर जॉईन व्हायचं असेल तर HR शी चर्चा करून नोटीस पिरीएड कमी करण्याचा पर्याय विचारू शकता. नियमांचे पालन केल्यास फुल अँड फायनल सेटलमेंटमध्ये कोणतीही अडचण येत नाही.