Siddhi Hande
रोज जेवायला काय बनवायचा असा प्रश्न गृहिणींना पडलेला असतो. झटपट आणि पौष्टिक अशी मिक्स कडधान्याची उसळ तुम्ही बनवू शकतात.
मिक्स कडधान्याची उसळ बनवण्याची रेसिपी खूप सोपी आहे. यामध्ये वेगवेगळे कडधान्य असतात त्यामुळे शरीरासाठी फायदेशीर असते.
मोड आलेली कडधान्ये, मूग, मटकी, चवळी, वाटाणा, हरभरा, मोहरी, जिरे, कढीपत्ता, कांदा, आलं लसूण पेस्ट, घाटी मसाला, लाल तिखट, टॉमेटो, मीठ, कोथिंबीर
सर्वात आधी तुम्हाला मोड आलेली कडधान्ये धुवून घ्यायची आहे.
कढईत तेल गरम करा. त्यात मोहरी, जिरे, कढीपत्त्याची फोडणी द्या. त्यात बारीक चिरलेला कांदा टाका.
कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घ्या. त्यात आलं लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट आणि घाटी मसाला टाका.
यामध्ये आता बारीक चिरलेला टॉमेटो टाकावा. तेल सुटेपर्यंत हे छान परतून घ्यावे.
यानंतर तुम्हाला कडधान्ये टाकायची आहेत. यामध्ये आवश्यकतेनुसार गरम पाणी आणि मीठ टाकायचे आहे.
यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही शेंगदाण्याचा कूट टाकू शकतात. जेणेकरुन आमटी थोडी घट्ट होईल.
यानंतर १५-२० मिनिटे झाकण ठेवून शिजवून घ्या. यानंतर उसळीवर कोथिंबीर आणि ओलं खोबरं टाकून सर्व्ह करा.