nitesh rane saam tv
महाराष्ट्र

Sindhudurg Political News : 'बॅनर-पोस्टर लावणारे बाजारपेठेत खूप मिळतात', महायुती अभेद्य म्हणणा-या नितेश राणेंकडून शिंदे गटाच्या पदाधिका-याला टाेमणा

महायुती मेळाव्याच्या दाेनच दिवसानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकारण तापल्याचे चित्र आहे.

Siddharth Latkar

- विनायक वंजारे

Sindhudurg News :

बिडवाडी येथील रस्त्याच्या कामावरुन श्रेयवाद उफाळल्याचे चित्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिसून येत आहे. भाजप नेते आमदार नितेश राणे (nitesh rane latest marathi news) एका व्हायरल व्हिडिओची चर्चा जाेरदार रंगू लागली आहे. यामध्ये राणेंनी बॅनर- पोस्टर लावणारे बाजारपेठेत खूप मिळतात त्यांना तिथपर्यंतच ठेवा अशी टिप्पणी केली आहे. ही टिप्पणी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. (Maharashtra News)

कणकवली येथे रविवारी झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात भाजप आमदार नितेश राणेंनी व्यासपीठावरून महायुतीचे गोडवे गायले होते. जिल्ह्यात महायुती अभेद्य असून आपण एकत्र लढलो तर विरोधक औषधाला पण राहणार नाहीत असे विधान केले होते.

दोन दिवसानंतर शिंदे गटाकडून बिडवाडी गावातील कणखरेवाडी रस्त्यासाठी भरघोस निधी मंजूर केल्याचा बॅनर शिंदे शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांच्या माध्यमातून लावण्यात आला.

त्यावर आमदार नितेश राणे यांनी आपणच हा रस्ता मंजूर केल्याचे सांगत निधी आणण्याची शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांची पात्रता नाही असे विधान केले. बॅनर-पोस्टर लावणारे बाजारपेठेत खूप मिळतात, त्यांना तिथपर्यंतच ठेवा असेही राणेंनी म्हटले.

राणेंचा व्हिडिओ व्हायरल

राणेंचा हा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल हाेऊ लागला आहे. एकीकडे मित्रपक्षावर व्यासपीठावर चांगल बोलायच आणि नंतर त्यांच्यावर जहरी टिका करायची अशा भूमिकेने नितेश राणे अडचणीत येऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: जुन्या रेल्वे डब्यांचा वापर रेल्वे कसा आणि कुठे करते? जाणून घ्या सर्व माहिती

Sabudana Thalipeeth Recipe : आषाढी एकादशीसाठी झटपट गरमा गरम साबुदाणा थालीपीठ रेसिपी

Neena Gupta Birthday: लग्न न करता झाली आई, मुलीसाठी केला संघर्ष; नीना गुप्ताने अशा प्रकारे मिळवले इंडस्ट्रीत हक्काचे स्थान

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Nashik Rain: नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर, रामकुंड परिसरात हुल्लडबाजांचा हैदोस|VIDEO

SCROLL FOR NEXT