NITESH RANE CONVOY PROTESTED WITH CHICKENS IN YAVATMAL Saam tv
महाराष्ट्र

मंत्री राणेंच्या ताफ्यावर फेकल्या कोंबड्या; पाहा VIDEO

Nitesh Rane’s Convoy Faces Protest in Yavatmal: यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील मानकिन्ही येथे मंत्री नितेश राणे यांच्या ताफ्यासमोर ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कोंबड्या दाखवत निषेध केला. मच्छीमारांच्या प्रश्नांवरून घोषणाबाजी करत मदतीची मागणी करण्यात आली.

Omkar Sonawane

यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील मानकिन्ही येथे तलावाची पाहणी आणि मच्छीमारांशी संवाद साधण्यासाठी मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांच्या ताफ्यासमोर ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. दारव्हा ठाकरे सेनेचे तालुकाप्रमुख रवी तरटे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी मंत्री नितेश राणे यांच्या ताफ्यासमोर कोंबड्या दाखवत आंदोलन केले. यावेळी मच्छीमारांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.

ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राणे यांच्या ताफ्यासमोर विविध घोषणा देत मच्छीमारांना मदत जाहीर करण्याची मागणी केली. मच्छीमारांबाबत एवढीच सहानुभूती असेल, तर मच्छीमारांसाठी मदत जाहीर करा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

दरम्यान, यवतमाळ जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असताना मानकिन्ही येथील तलावात पाणीच नसल्याचा दावा ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. तलावात पाणी नसताना पाहणी कशासाठी? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या आंदोलनादरम्यान मंत्री नितेश राणे यांच्या ताफ्यासमोर काही काळ घोषणाबाजी करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

cooking oil storage : ओट्यावर तेल नेहमी सांडत? मग, या ठिकाणी ठेवा तेलाची बाटली, तेल होणार नाही कधीच खराब

How Much Water To Drink Daily: 1, 2, 3, 4, की 5, दररोज किती लिटर पाणी प्यावे? नेमकं प्रमाण जाणून घ्या

Maharashtra News Live Update: राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीला

Bigg Boss 20: 'बिग बॉस २०’मध्ये या आठवड्यात कोण होणार बेघर? काझी ते मेरी कॉमपर्यंत ७ स्पर्धकांवर एलिमिनेशनची टांगती तलवार

Hiccups: उचकी का लागते? खरंच कोणी आठवण काढल्यावर उचकी येते?

SCROLL FOR NEXT