Nitesh Rane addressing a Hindu Sammelan in Pune where he made controversial remarks linking Shah Rukh Khan’s films to Love Jihad cases Saam tv
महाराष्ट्र

शाहरुख खानचे चित्रपट पाहून लव्ह जिहादच्या केस वाढल्या; मंत्री नितेश राणेंचा खळबळजनक दावा

Nitesh Rane ShahRukh Khan Love Jihad Claim Controversy: पुण्यातील हिंदू संमेलनात मंत्री नितेश राणे यांनी शाहरुख खानच्या चित्रपटांमुळे लव्ह जिहादच्या घटना वाढल्याचा दावा करत वाद निर्माण केला आहे.

Omkar Sonawane

पुणे: धानोरी येथील भैरवनगर परिसरात आयोजित विराट हिंदू संमेलनात बोलताना मंत्री नितेश राणे यांनी अत्यंत आक्रमक आणि वादग्रस्त विधाने केली आहेत. हिंदू समाज एकत्र आला तर कोणतीही ताकद त्याला रोखू शकत नाही असा इशारा ही त्यांनी दिला. तसेच शाहरुख खानचे चित्रपट पाहून लव्ह जिहादच्या केसेस वाढल्या आहेत. असा खळबळजनक दावाही त्यांनी यावेळी केला. चित्रपटसृष्टीतील प्रभावामुळे हिंदू मुलींना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करायची आणि योजनेचा लाभ घ्यायला बुरखा घालून पुढे यायचे असा टोलाही त्यांनी लगावला. लाडक्या बहीणींचे सर्वात जास्त लाभार्थी त्यांच्याच घरात आहेत. एका एका घरात 73 हजार रुपये जात असल्याची माहिती आम्ही काढली आहे असा दावा त्यांनी केला. आपले 'हम दो हमारे दो' आहे, पण त्यांचे हम दो हमारे दोसो चालले आहे असे म्हणत त्यांनी लोकसंख्येच्या मुद्यावरूनही टीका केली.

आपल्या हिंदू संस्कृतीचे रक्षण हीच खरी राष्ट्रभक्ती आहे. हिंदू समाजाने आता एकत्र येण्याची वेळ आली आहे असे आवाहन त्यांनी भैरवनगर येथील विराट हिंदू संमेलनात केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care Tips : तिशीतच केस पांढरे होत आहेत, काळेभोर केस या करण्यासाठी घरगुती उपायांचा वापर करा

Maharashtra News Live Update: बीड पोलिसांना 112 वर खोटा फोन करणाऱ्या दोघांवर गुन्हा

मसाला डोसा खाऊन कंटाळा आलाय? नाश्त्याला बनवा पौष्टिक आणि कुरकुरीत 'शेवग्याच्या शेंगाचा डोसा'

Kobi Matar Bhaji Recipe : कोबीच्या भाजीला द्या मसालेदार ट्विस्ट, बनवा ढाबा स्टाइल कोबी मटर मसाला

Mumbai : मुंबईतील रॅलीपूर्वी मनसे नेते संदीप देशपांडेंच्या टीशर्टची जोरदार चर्चा; भाजपला डिवचलं

SCROLL FOR NEXT