nitesh rane Saam Tv
महाराष्ट्र

विजयाचा आनंद; नितेश राणे जनतेसमाेर येऊन म्हणाले गाडलाच..

आज मतमाेजणी सुरु झाल्यानंतर तसेच निकाल समजताच भाजपने जल्लाेष केला.

अनंत पाताडे, अमोल कलये, संभाजी थोरात

सिंधूदूर्ग : सिंधुदूर्ग जिल्हा बँक निवडणूकीत (Sindhudurg District Central Co-operative Bank Election) १९ जागांपैकी १५ जागांवर भाजपने म्हणजेच नारायण राणे गटाची सरशी आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीने ४ जागांवर विजयी मिळविला आहे. दरम्यान खूनाच्या गुन्ह्यात पाेलिसांना हवे असलेले आमदार नितेश राणे यांनी समाज माध्यमांतून 'गाडालाच' इतकंच लिहून कणकवलीतील विजयावर भावना व्यक्त केल्या आहेत. राणे समर्थक त्यांच्या प्रतिक्रियेवर सर्व विजयी उमेदवारांना शुभेच्छा देताहेत. Nitesh Rane Congraulates BJP Winning Candidates Sindhudurg District Central Co-operative Bank Election)

ही निवडणुक राणे गट विरुद्ध महाविकास आघाडी (Nitesh rane vs Mahavikas aghadi) अशीच हाेती. मविआचे प्रमुख उमेदवार बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांचा पराभव झाला आहे. सावंत हे नारायण राणे (narayan rane) गटाचे प्रमुख विराेधक मानले जातात. त्यांनी राणे गटा विराेधात निवडणुकीत रान पेटवलं हाेते. सावंत यांना विठ्ठल देसाई यांच्याकडून इश्वर चिठ्ठीच्या माध्यमातून पराभव स्विकारावा लागला आहे. (Sindhudurg District Bank Election Live updates)

आजचा विजय नारायण राणे यांच्या समर्थकांकडून मुंबईतील त्यांच्या बंगल्यावर देखील साजरा करण्यात येत आहे. तेथे फटाक्यांची आतषबाजी करण्यात येत आहे. दुपारी नारायण राणे हे कणकवलीत जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबलं अन् कार थेट गंगेत; नाविकांनी वाचवले नवऱ्या-बायकोचे प्राण;VIDEO

Vijay Melava Worli: 'ऐ काका उठना.....' राज ठाकरेंनी सांगितला बाळासाहेबांसोबतचा तो किस्सा, पाहा, VIDEO

Maharashtra Live News Update: चांदोली धरणातून‌ 4 हजार 500 क्युसेक विसर्ग

SCROLL FOR NEXT