Police raid at Ichalkaranji's Café Adda where secret rooms and suspicious items were found during Nirbhaya Squad action. saam tv
महाराष्ट्र

Kolhapur Crime: कॅफेच्या आड चालायचा भलताच प्रकार! कॅफेत स्पेशल रुम अन् सापडली कंडोमची पाकीटं

Ichalkaranji Police Raid Famous Cafe: इचलकरंजीतील एका प्रसिद्ध कॅफेवर पोलिसांनी छापा टाकला. या कॅफेत गुप्त खोल्या आढळून आल्या. यात बेकायदेशीर कृत्य होत होते. पोलिसांना कंडोमचे पॅकेट सुद्धा सापडली आहेत. अनेक तक्रारी आल्यानंतर निर्भया पथकाने गुप्त कारवाई केली.

Bharat Jadhav

  • इचलकरंजीतील ‘कॅफे अड्डा’वर निर्भया पथकाने अचानक छापा टाकला.

  • छाप्यात स्पेशल रुम आणि कंडोम पाकिटे आढळल्याने गैरप्रकार उघडकीस आले.

  • पोलिसांनी तोतया ग्राहक बनून केलेल्या तपासानंतर ही कारवाई झाली

कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरात भलताच प्रकार समोर आलाय. शहरातील झेंडा चौक परिसरातील एका प्रसिद्ध 'कॅफे अड्डा' पोलिसांच्या निर्भया पथकाने अचानक कारवाई करत छापा टाकला. कॅफेतील प्रकार अनेकांच्या भुवया उंचावल्या. कॅफेच्या आड भलताच प्रकार चालत असल्याची बाब उघडकीस आली.

शहरात कॅफेची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलीय. यात काही ठिकाणी बेकायदेशीर आणि अश्लील प्रकार सुरू आहेत, याची माहिती कोल्हापूर पोलिसांना मिळाली. त्यानुसार निर्भया पथकाने तोतया ग्राहक बनून कॅफेमध्ये प्रवेश करत गैरप्रकार उघडकीस आणला. कॅफेमधील प्रकार उघडकीस आल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे.

कॅफेत जोडप्यांसाठी स्पेशल रूम

पोलिसांच्या निर्भया पथकाने कारवाई केलेला कॅफे झेंडा चौक परिसरातील आहे. हा कॅफे प्रसिद्ध 'कॅफे अड्डा' आहे. यात जोडप्यांसाठी स्वतंत्र दोन रुम होत्या. वाढदिवस साजरा करण्यासाठी वेगळी रुम आणि विशेष म्हणजे 350 रुपयांत अश्लील चाळ्यांसाठी खोली भाड्याने दिली जात असल्याचा प्रकार समोर आला. या कॅफेमध्ये पथकाने छापा मारल्यानंतर कारवाईदरम्यान कॅफेमध्ये उपस्थित तरुण-तरुणींची धांदल उडाली.

काही कॉलेज विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच बाहेरगावातून आलेले ग्राहकही आढळून आले. या रुममध्ये कंडोमची पाकीट सुद्धा सापडली आहेत. या प्रकरणी कॅफे मालक संकेत हुबळे आणि कॅफे चालक शैलेश चंदूरे यांच्यावर गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कारवाईची माहिती कळताच शहरातील अनेक कॅफे चालकांनी गावभाग पोलीस ठाण्यासमोर मोठी गर्दी केली.

आता प्रमुख शहरांपासून ते गावोगावात कॅफे कल्चर वाढलंय. काम करण्यासाठी, मित्रमैत्रिणींना भेटण्यासाठी कॅफे सोयीचे ठरतंय. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीमध्ये कॅफे हे आंबट शौकिनांचा अड्डा बनलाय. इचलकरंजी शहरातील झेंडा चौक परिसरातील प्रसिद्ध 'कॅफे अड्डा' मध्ये अश्लील प्रकार सुरु असल्याची माहिती निर्भया पथकाला मिळाली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात महाविकास आघाडीच ठरलं! काँग्रेस, शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार

मोठी बातमी! BMC साठी भाजपकडून ६६ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कुणा-कुणाला दिली संधी?

Railway Fire : धावत्या ट्रेनला भीषण आग, २ डबे जळून खाक; एकाचा मृत्यू तर अनेक जण होरपळले; थरारक VIDEO समोर

Paneer Bhurji Recipe : नाश्ता अन् जेवणासाठी झटपट बनवा ढाबा स्टाईल पनीर भुर्जी

FSSAI Recruitment: ग्रॅज्युएट आहात? FSSAI मध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कसा करावा? वाचा

SCROLL FOR NEXT