Culprit Arrested Saam Tv
महाराष्ट्र

Latur : तिरूपतीला निघालेले दरोडेखोर जेरबंद; एमआयडीसी पाेलिसांची कारवाई

या प्रकरणातील तीन आरोपींना यापूर्वीच अटक केलेली आहे अशी माहिती आज पोलिस उपनिरीक्षक संदीप कराड यांनी दिली.

दीपक क्षीरसागर

लातूर : लातूर (latur) तालुक्यातील भूईसमुद्रा येथील एक वेअरहाऊसवर दरोडा टाकून १ लाख ७० हजार रुपये किंमतीचे सोयाबीनचे १४० कट्टे व १२ हजार रुपयांची रोकड दरोडेखोरांनी लंपास केल्याची घटना १७ जून रोजी घडली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी नुकतेच नऊ जणांना ताब्यात घेतले आहे. (Latur Crime News)

या गुन्ह्यातील संशयित आरोपी एक खासगी बस भाड्याने करून तिरूपतीला देवस्थानला जात असल्याची गुप्त माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. त्यानंतर पाेलिसांनी लातूरच्या पाच नंबर, शहीद वीर भगतसिंग चौकात सापळा रचला.

रात्री नऊच्या सुमारास बस चौकात येताच पोलिस उपनिरीक्षक संदिप कराड व त्यांच्या पथकाने बसवर ताबा मिळवत संशयितांसह बस थेट ठाण्यात नेली. यामध्ये आठ अट्टल गुन्हेगारांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. आठपैकी चार संशयित हे ढोकी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील असल्याने त्यांना ढोकी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

इतर चार संशयित आरोपी अनिल बप्पा काळे, आकाश उर्फ तोब्या मधू पवार, राहुल तानाजी पवार सर्व रा. पळसप ता. जि.धाराशिव हे भूईसमुद्रा येथील वेअर हाऊस दरोडा प्रकरणातील असून एमआयडीसी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील तीन आरोपींना यापूर्वीच अटक केलेली आहे अशी माहिती आज पोलिस उपनिरीक्षक संदीप कराड यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ginger Tea : रोज आल्याचा चहा पिता? थांबा! ५ गंभीर दुष्परिणाम वाचताच 'ही' सवय सोडाल

Postpartum diet: बाळंतपणानंतर वजन कमी करण्याची घाई नको; आधी शरीराला नेमकं काय हवं ते जाणून घ्या

Maharashtra News Live Update: शहाजी बापू पाटील यांचा अवघ्या 12 तासात घुमजाव

Vivekanand Patil: भाषणानं MPSC आंदोलन गाजवलं, महाराष्ट्रात चर्चा, कोण आहेत हे विवेकानंद पाटील?

Sanjay Dutt: भारतात पूर्वीसारखी शांतता नाही...; ट्रोल होताच संजय दत्तने दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT