FIFA चा भारताला मोठा धक्का; भारतीय फुटबॉल फेडरेशनचे निलंबन

भारतीय फुटबॉल चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.
AIFF
AIFFSaam Tv

FIFA Suspend AIFF: भारतीय फुटबॉल खेळाडू आणि चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. कारण फिफाने अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनवर (AIFF) मोठी कारवाई केली आहे. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ असोसिएशन फुटबॉल (FIFA) ने अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनला तत्काळ प्रभावाने निलंबित केले आहे.

नियमांचे उल्लंघन केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे फिफाने म्हटले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे 16 ऑगस्टपासून कोलकातामध्ये ड्युरँड चषक स्पर्धा सुरू होत आहे. यामध्ये बंगळुरू एफसीचा संघ जमशेदपूर एफसीशी भिडणार आहे. त्याशिवाय, ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या 17 वर्षाखालील महिला विश्वचषक स्पर्धेचे यजमानपदही काढून घेतले आहे. तिसऱ्या पक्षाकडून होत असलेल्या हस्तक्षेपाच्या मुद्यावरुन फिफाने ही कारवाई केली आहे.

हे देखील पाहा -

FIFA ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, FIFA कौन्सिलच्या ब्युरोने एकमताने अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला "अनावश्यक हस्तक्षेप" साठी तात्काळ निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. हे फिफाच्या नियमांचे उल्लंघन आहे.

अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या कार्यकारी समितीचे अधिकार स्वीकारण्यासाठी प्रशासकांची समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव रद्द करण्याचा निर्णय मागे घेतल्यानंतर आणि फुटबॉल फेडरेशनकडे संपूर्ण अधिकार आल्यानंतर ही निलंबनाची कारवाई मागे घेण्यात येणार असल्याचे फिफाने स्पष्ट केले.

AIFF
Latur Crime: बनावट कागदपत्राद्वारे फसवणूक प्रकरणी आठ जणांविरुध्द गुन्हा दाखल

FIFA निवेदनात म्हटले आहे की निलंबनाचा अर्थ असा आहे की 11 ते 30 ऑक्टोबर 2022 दरम्यान भारतात होणारा FIFA U-17 महिला विश्वचषक 2022 देखील होणार नाही. भारतीय क्रीडा मंत्रालयाच्या संपर्कात असून या प्रकरणात सकारात्मक परिणाम मिळू शकेल अशी आशा फिफाने व्यक्त केली आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला, फिफाने तिसऱ्या पक्षाच्या हस्तक्षेपासाठी एआयएफएफला निलंबित करण्याचा इशारा दिला होता. सुप्रीम कोर्टाने भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या कार्यकारणीच्या निवडणुका घेण्याच्या निर्देशानंतर काही दिवसांतच हा इशारा देण्यात आला होता. 28 ऑगस्ट रोजी AIFF च्या निवडणुका होणार आहेत. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात 17 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com