विजेच्या धक्क्याने 4 रोहींचा मृत्यू; सुकांडा शेत शिवारातील घटना... गजानन भोयर
महाराष्ट्र

विजेच्या धक्क्याने 4 रोहींचा मृत्यू; सुकांडा शेत शिवारातील घटना...

रोहीचा मृत्यू जवळपास आठवडा भरा पुर्वी झाल्याचा अंदाज

गजानन भोयर

वाशिम - जिल्ह्यातील राजुरा- मालेगाव Malegaon वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या सुकांडा शेतशिवारात विजेच्या लोंबकळलेल्या तारांमधील प्रवाहाच्या धक्क्याने 4 रोह्यांचा मृत्यू Death झाल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सुकांडा येथील शेतकरी Farmer पांडुरंग घुगे यांच्या शेता नजिक गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असल्याने शेतशिवारातील काही शेतकऱ्यांनी दुर्गंधी येत असलेल्या जागेवर जाऊन पाहणी केली.

हे देखील पहा -

परिसराची पाहणी केली असता त्यांना विजेच्या लोंबकळलेल्या तारा खांली चार रोही मृत्युमुखी पडल्याचे दिसून आले. रोहिच्या शरीराचे केवळ हाडांचे सांगाडेच घटनास्थळावर दिसून येत असल्याने रोहीचा मृत्यू जवळपास आठवडा भरा पुर्वी झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

घटनास्थळावरून वीजेच्या मुख्य प्रवाहाची लाईन गेलेली असुन मागील अनेक दिवसांपासून लाईनचे दोन पोल खाली वाकले असल्याने त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी वेळोवेळी करूनही संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे चार रोह्यांचा बळी गेला आहे. त्यामुळे आतातरी अशा लोंबकळलेल्या विद्युत वहिनीची दुरुस्ती करावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अजित पवारांना मोठा धक्का, पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे 74 उमेदवार आघाडीवर |VIDEO

Jalgaon Municipal Election Result: भाजपनंतर राष्ट्रवादीनं उघडलं विजयाचं खातं; बंडखोर उमेदवाराचा दारूण पराभव

Biscuit Side Effect: नाश्त्याला रोज बिस्किट खल्ल्याने शरिरावर कोणता वाईट परिणाम होतो?

Maharashtra Elections Result Live Update : पुण्यात भाजपचे चौथे पॅनल विजयी, सर्व महिला उमेदवार जिंकल्या

Masala Khichdi Recipe: हॉटेलसारखी मसाला खिचडी कशी बनवायची?

SCROLL FOR NEXT