काेविडच्या तिस-या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सज्ज : मुख्यमंत्री

goa chief minister pramod sawant
goa chief minister pramod sawant
Published On

गाेवा : काेविड १९ च्या तिस-या संभाव्य लाटेत covid 19 third wave रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी सरकारने उपाययाेजना करुन ठेवल्या आहेत अशी माहिती मुख्यमंत्री डाॅ. प्रमाेद सावंत goa chief minister pramod sawant यांनी येथे माध्यमांना दिली. मुख्यमंत्री डाॅ. सावंत यांच्या हस्ते साेमवारी ऑक्सिजन प्लांटचे oxygen plant लाेकापर्ण झाले. त्यावेळी ते बाेलत हाेते. प्रारंभी मुख्यमंत्री डाॅ. सावंत यांनी ३१ हजार लिटरची ऑक्सिजन टाकी दिल्याबद्दल एसबीआय फाैंडेशनचे आभार मानले.

goa chief minister pramod sawant
साेमय्यांच्या ७ काेटी रकमेच्या प्रश्नावर खासदार गवळींचे हे उत्तर

मुख्यमंत्री डाॅ. प्रमाेद सावंत म्हणाले देशात ऑक्सिजनची कमतरता भासल्याने काेविड १९ रुग्णांना जीव गमवावा लागला हे वेदनादायी आहे. राज्यात काेविड १९ च्या रुग्णांना उपचारात काेणतीही कमतरता भासू नये यासाठी अटाेकाट प्रयत्न करीत आहाेत. काेविड १९ च्या संभाव्या तिस-या लाटेवर मात करण्यासाठी उपाययाेजना करीत आहाेत. यासाठी सरकारला स्वयंसेवी संस्थांचे माेलाचे सहकार्य लाभत आहे.

राज्य सरकारने आत्ता पर्यंत ७१ हजार लिटर ऑक्सिजनची निर्मिती केलेली आहे. सरकारला ऑक्सिजन निर्मितीसाठी स्वंयसेवी संस्थांसह स्थानिक सामाजिक संस्था मदत करीत आहेत. गाेव्यातील काेविड रुग्णांची संख्या नियंत्रित असली तरी नागरिकांनी काेविड १९ ची मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे असे आवाहन मुख्यमंत्री डाॅ. सावंत यांनी केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com