nilesh rane on Maratha Reservation  Saam tv
महाराष्ट्र

Maratha Reservation : राणे कुटुंबावर हात टाकण्याची भाषा केली तर...; जरांगेंनी भावावर टीका केल्यानंतर निलेश राणे संतापले

nilesh rane on Maratha Reservation : जरांगेंनी मंत्री नितेश राणेंवर जहाल टीका केली. यानंतर निलेश राणे यांनी फेसबुकवर पोस्ट करत टीका केली.

Vishal Gangurde

मनोज जरांगे पाटील यांची नितेश राणेंवर टीका

निलेश राणे यांचा फेसबुकवरून जरांगेंना सल्ला

राणे कुटुंब कोणत्याही धमकीला घाबरत नसल्याचं निलेश राणे यांनी म्हटलं.

मराठा आरक्षणाच्या आंदोलनाभोवती राजकीय वातावरण तापलं

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीवरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री नितेश राणे यांच्यावरही जोरदार टीका केली. मनोज जरांगेंच्या टीकेनंतर शिंदे गटाचे आमदार निलेश राणे कुटुंबासाठी धावून आले आहेत. निलेश राणे यांनी फेसबुक पोस्ट करत वैयक्तिक टीका न करण्याचा सल्ला जरांगे पाटील यांना दिला.

मनोज जरांगे पाटील हे गेल्या ४ दिवसांपासून आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाने राजकीय वातावरण तापलं आहे. मनोज जरांगेंवर नितेश राणे यांनी हिंदूमध्ये फूट पाडल्याचा आरोप केला. तसेच राणेंनी आंदोलनाला रोहित पवार रसद पुरवत असल्याचा आरोप केला.

नितेश राणे यांच्या आरोपांना मनोज जरांगे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. मनोज जरांगे यांनी आरोपांना उत्तर देताना चिचुंद्री म्हणत मंत्री नितेश राणेंवर टीका केली. नितेश राणे यांच्यावरील जहाल टीका केल्यानंतर निलेश राणे यांनी म्हटलं की, 'नितेश राणे एखाद्या विषयावर बोलल्यानंतर त्यावर तुम्ही टीका करा. पण वैयक्तिक टीका नको'.

'नितेश काही टोकाचे बोलला नाही किंवा वैयक्तिक बोलला नाही. कुठल्याही धमकीला राणे कुटुंब कधीच घाबरत नाही. तुम्ही जसे मरायला तयार असता, तसेच आम्ही राणे पण असतो. मनोज जरांगे पाटील तुमचं आणि माझं संबंध नेहमी आपुलकीचे राहिले, कौटुंबिक राहिलेत, ते तसेच राहिले पाहिजे. मी आजपर्यंत नातं जपलं. पुढेही जपेन आपल्याकडून पण तीच अपेक्षा आहे, अशा प्रकारची पोस्ट आमदार निलेश राणे यांनी फेसबुक पेजवरून पोस्ट केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मालेगाव संगमेश्वर येथे शैक्षणिक साहित्यातून साकारली 18 फुटी गणरायाची मूर्ती

Horoscope: पाच राशींच्या जीवनात येणार चढ-उतार; भुतकाळामुळे वाद होण्याची शक्यता

Hindu Wedding Traditions: दिवसा की रात्री? लग्न करण्यासाठी योग्य वेळ कोणती? काय सांगतं ज्योतिषशास्त्र

Mhada 2025 : खूशखबर! मुंबई, नाशिकमध्ये म्हाडाची ६०० हून अधिक घरे उपलब्ध होणार; अर्ज कधी अन् कुठे करायचा? जाणून घ्या

Train Full Form: ट्रेनने रोजच प्रवास करताय? पण तुम्हाला ट्रेनचा फुलफॉर्म माहितीये का?

SCROLL FOR NEXT