nilesh rane criticises sharad pawar saam tv
महाराष्ट्र

साहेब! ५० वर्षाच्या राजकारणात आपण काय केलं; निलेश राणेंची शरद पवारांना विचारणा

आज पुण्यात पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या पुणे मेट्राेचे उदघाटन झाले.

साम न्यूज नेटवर्क

कणकवली : पुणे मेट्रोच्या (pune metro) गरवारे स्थानकाचे आज (रविवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते लाेकापर्ण झाले. त्यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, पालकमंत्री अजीत पवार, विराेधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवर उपस्थीत. दरम्यान आत्ता पर्यंत पुणे मेट्रोचा पाच किलाे मीटरचा टप्पा पुर्ण झाला आहे. अद्याप मेट्राेचे काम अपुर्ण असल्याने राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी मेट्राेचे लाेकापर्ण करणे संयुक्तिक ठरणार नाही अशी टीका शनिवारी केली हाेती. त्यावर आज भाजप नेते माजी खासदार निलेश राणेंनी (Nilesh Rane) ट्विट करुन ज्येष्ठ नेते पवार यांनी प्रश्न विचारला आहे. (pune metro latest marathi news)

पवार साहेब मेट्रो संदर्भात टीका करतात पण आम्हाला सांगा साहेब आपल्या ५० वर्षाच्या राजकारणात आपण किती किलोमीटर मेट्रो आणली?? असा प्रश्न माजी खासदार निलेश राणेंनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना ट्विट करुन विचारला आहे.

दरम्यान काही वेळापुर्वीच पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी मेट्राेचे लाेकापर्ण केले. माेदींनी गरवारे मेट्राे स्थानक ते आनंदनगर मेट्राे रेल्वे स्थानकापर्यंत प्रवास केला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Colorectal Cancer Diet: खाण्यापिण्याच्या बदलामुळे होऊ शकतो 'आतड्याचा कॅन्सर', आत्ताच 'हे' पदार्थ खाणं सोडा

Maharashtra Live News Update: मकर संक्रांतीनिमित्त नागपुरातील १५ उड्डाणपूल बंद

Kitchen Hacks : भाज्यांमध्ये तिखटपणा जास्त झाल्यास काय करावे? जाणून घ्या टिप्स

Bharti Singh : "देवाचे आभार की, मला मुलगी नाही", कॉमेडी क्वीन भारती सिंह असं का म्हणाली?

DRDO Internship: फ्रेशर्स आहात? डीआरडीओमध्ये इंटर्नशिपची संधी; अर्ज कुठे अन् कसा करावा?

SCROLL FOR NEXT