World Cup: पूजा वस्त्राकर, स्नेह राणाची शानदार खेळी; पाकिस्तानपुढं २४५ धावांचे आव्हान

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली.
cricket womens world cup 2022
cricket womens world cup 2022saam tv
Published On

माऊंट मौनगानुई : भारताच्या (india) पूजा वस्त्राकर (Pooja Vastrakar) आणि स्नेह राणा (Sneh Rana) यांनी पाकिस्तान (pakistan) विरुद्ध शानदार खेळी करीत सातव्या विकेटसाठी ९७ चेंडूत १२२ धावांची भागीदारी केल्याने भारतीय संघास ५० षटकात सात बाद २४४ धावांचा पल्ला महिला विश्वकरंडक २०२२ स्पर्धेत (womens world cup) गाठता आला. पूजाने ५९ चेंडूत सर्वाधिक ६७ धावा केल्या. स्नेह राणाने ४८ चेंडूत नाबाद ५३ धावा केल्या. याशिवाय स्मृती मंधानाने ७५ चेंडूत ५२ धावांची खेळी केली. भारतीय संघाने पाकिस्तानपुढं २४५ धावांचे उद्दीष्ट ठेवलं आहे. (india pakistan womens world cup latest marathi news)

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. शेफाली वर्मा (shefali varma) शून्यावर बाद झाली. यानंतर दीप्ती शर्मा आणि स्मृती मानधना (smirit mandhana) या जाेडीने भारताला चांगल्या स्थितीत नेले. दुसऱ्या विकेटसाठी ११६ चेंडूत ९२ धावांची त्यांची भागीदारी झाली. ९६ धावांच्या एकूण धावसंख्येवर असताना भारतास दुसरा धक्का बसला. दीप्ती (deepti sharma) ४० धावा करून बाद झाली. यानंतर स्मृतीने वनडे कारकिर्दीतील २१ वे अर्धशतक झळकावले. मात्र, त्यानंतर ती फार काळ मैदानावर टिकू शकली नाही.

cricket womens world cup 2022
Pune: गो बॅक गो बॅक नरेंद्र मोदी गो बॅक; काॅंग्रेसनं दणाणून साेडला अलका चाैक

मानधना बाद होताच भारतीय संघाचे एकेक फलंदाज तंबूत परतू लागले. ११४ धावसंख्ये पर्यंत भारताने सहा गडी गमावले. यामध्ये पाकिस्तानने १८ धावांत भारातचे पाच गडी गारद केले. कर्णधार मिताली राज (mithali raj) नऊ धावा, उपकर्णधार हरमनप्रीत कौर पाच धावा आणि ऋचा घोष एक धावेवर बाद झाले. यानंतर स्नेह आणि उपासनेने भारताला २०० च्या पुढे नेले. दोघांमधील १२२ धावांची भागीदारी ही सातव्या विकेटसाठी भारताची सर्वोच्च भागीदारी ठरली.

त्याचवेळी पूजाने आठव्या विकेटवर केलेल्या ६७ धावा या भारतीय फलंदाजाची सर्वोच्च धावसंख्या आहे. स्नेह ५३ धावा आणि झुलन गोस्वामी सहा धावा करून नाबाद राहिले. पाकिस्तानकडून निदा दार आणि नशरा संधूने प्रत्येकी दोन गडी तर डायना बेग, अनम अमीन आणि फातिमा सना यांना प्रत्येकी एक गडी बाद केला.

दरम्यान पाकिस्तानचा डाव सुरु झाल्यानंतर त्यांच्या पाच षटकात बिनबाद सहा धावा झाल्या हाेत्या.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com