Nilesh Rane, Sharad Pawar,  saam tv
महाराष्ट्र

Sharad Pawar राजकीय ब्लॅकमेलर; Nilesh Rane यांची टीका, उद्धव ठाकरेंनाही इशारा (पाहा व्हिडिओ)

Uddhav Thackeray Your Time Starts Now असा इशारा माजी खासदार निलेश राणेंनी ठाकरेंना दिला.

Siddharth Latkar

- विनायक वंजारे

Nilesh Rane News : देशात तिसरी आघाडी करण्यासाठी शरद पवार हे काॅंग्रेसच्या (congress) काळापासूनच प्रयत्नशिल राहिले. राजकीय पक्षांना (काॅंग्रेस) ब्लॅकमेल करण्याची ही त्यांची पद्धत आहे. त्यामुळे शरद पवार (sharad pawar) यांनी ब्लॅकमेलर म्हणून स्वतःचा एक वेगळा कोपरा निर्माण केला आहे असे म्हटलं तर वावगं ठरणार नाही अशी टीका राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर माजी खासदार भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी केली. Maharashtra News)

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (cm nitish kumar) आणि एनसीपीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटीविषयी माध्यमांनी माजी खासदार निलेश राणेंना छेडले असता राणेंनी शरद पवार हे सातत्याने कोणाला ना कोणाला भेटत असतात. त्यांच्या भेटीला काही अर्थ नाही. पवार साहेबांचा जो टोळी जमा करण्याचा प्रयत्न असतो तो कधीच यशस्वी झाला नाही.

शरद पवार साहेब यांनी अशी अनेक जेवण घातली आहेत मात्र त्यांच्या मिठाला कोणी जागलं नाही व तेही कोणाच्या मिठाला जागले नाहीत अशी प्रतिक्रिया शरद पवार व नितीशकुमार यांच्या भेटीवर दिली.

दरम्यान महाराष्ट्र राज्याच्या सत्तासंघर्षावरील सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालावर (Supreme Court Final Decision on Shivsena Case) प्रतिक्रिया देताना माजी खासदार भाजप नेते निलेश राणे यांनी युवर टाईम स्टार्ट नाऊ (uddhav thackeray your time starts now) असे म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना डिवचले आहे.

राणे म्हणाले दुसरे जाणार म्हणता म्हणता हेच गेले आणि यांचीच वाट लागली अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. या परिस्थितीला सर्वस्वी उद्धव ठाकरे जबाबदार आहेत. आता उद्धव ठाकरे यांची उतरती कळा सुरू झाली आहे. यातून उद्धव ठाकरे (uddhav thackeray) व त्यांचे कुटुंब सावरेल असं मला वाटत नाही असे सांगतानाच शिंदे फडणवीस सरकारचे अभिनंदनही निलेश राणे यांनी केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Politics:शिवसेनेच्या नगरसेवकाला भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण; कुटुंबियाचा आरोप,राजकारण तापलं

T20 World Cup: बांगलादेश आऊट! टी-२० विश्वचषकात खेळण्यास नकार

बदलापुरात ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, स्कूल व्हॅन फोडण्याचा प्रयत्न

महाराष्ट्रातील कोणत्या शहरात किती कोटींची गुंतवणूक आली? मुख्यमंत्र्यांनी सांगितला आकडा

Friday Horoscope : जुन्या कर्जापासून मुक्त होणार, प्रेमात यश मिळणार;५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

SCROLL FOR NEXT