Nanded devotees killed in fatal Solapur road accident 
महाराष्ट्र

Solapur : नव्या वर्षात देवदर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, ४ जणांचा जागीच मृत्यू, ८ गंभीर जखमी

Solapur Road Accident : अक्कलकोटवरून गणगापूरला दर्शनालाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातलाय. स्कॉर्पिओ आणि ट्रकच्या भीषण अपघातामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झालाय. मृत नांदेडमधील असल्याचे समजतेय.

Namdeo Kumbhar

विश्वभूषण लिमये, सोलापूर, साम टीव्ही प्रतिनिधी

Nanded devotees killed in fatal Solapur road accident : नव्या वर्षाचं राज्यभर उत्साहात स्वागत करण्यात आले. सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी अनेकजणांनी मंदिरात जाणं पसंत केले. नव्या वर्षात देवदर्शनाला जाताना काळाने घाला घातलाय. सोलापूरमध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झालाय. तर सात ते आठ जण गंभीर जखमी झाल्याचे समजतेय. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेय.

नवीन वर्षी देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातलाय. स्कॉर्पिओ आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झालाय. त्यामध्ये दोन महिला आणि दोन पुरूषांचा समावेश आहे. जखमींना सोलापूरमधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल कऱण्यात आलेय. गणगापूरला जात असताना मैंदर्गीजवळ अपघात झाल्याचे समजतेय. मृत हे नांदेड जिल्ह्यातील असल्याचे प्राथमिक माहितीमधून समोर आलेय.

अक्कलकोट श्री स्वामी समर्थ दर्शन घेऊन गणगापूरला जातं असताना मैंदर्गी जवळ स्कॉर्पिओ आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. समोरासमोर झालेल्या अपघातात 2 महिला आणि 2 पुरुष यांचा जागीच मृत्यू झाला. तर 7 ते 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व भाविक नांदेड जिल्ह्यातील आहेत. अपघातस्थळी अक्कलकोट पोलीस दाखल झाले असून जखमींना तातडीने अक्कलकोट सार्वजनिक रुग्णालयात करण्यात दाखल आले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: तरुणाकडून वयोवृद्ध आईवर दोनदा बलात्कार, आधी बेदम मारहाण नंतर...; म्हणाला - 'ही तुझ्या कर्माची शिक्षा'

Tejashree Pradhan: तेजश्री प्रधान मुंबईत कुठे राहते? माहितीये का?

'युतीचं डोक्यातून काढून टाका'; महायुतीत अलबेल नाही? अजित पवार गटाचे खासदार असं का म्हणाले?

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Ravivar Upay: रविवारच्या दिवशी सूर्यदेवाची पुजा केल्यानंतर करा 'हे' उपाय; अडकलेली सर्व कामं होणार पूर्ण

SCROLL FOR NEXT