New Twist in Satara Faltan Doctor Case Saam
महाराष्ट्र

साताऱ्यातील डॉक्टर आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; दुसऱ्या आत्महत्येचा संबंध उघड, पोस्टमॉर्टम रिपोर्ट खोटा अन्..

New Twist in Satara Faltan Doctor Case: साताऱ्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात नवीन वळण समोर. एका महिलेनं डॉक्टर तरूणीवर पोस्टमॉर्टम बदलण्याचा दावा केला होता.

Bhagyashree Kamble

साताऱ्यातील फलटण येथील उपजिल्हा रूग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात एका नवीन वळण आलं आहे. एका महिलेनं असा दावा केला की, तिच्या मुलीच्या मृत्यूचा खोटा पोस्टमॉर्टम रिपोर्ट तयार कऱण्यासाठी डॉक्टरवर दबाव टाकण्यात येत होता. मुलीच्या सासरच्या मंडळींकडून शवविच्छेदन अहवाल बदलण्यासाठी पोलीस तसेच राजकीय दबाव टाकण्यात येत होता, असा आरोप महिलेनं केला. या आरोपानंतर या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे.

भाग्यश्री मारूती पंचांगने नावाच्या या महिलेनं सांगितले की, तिच्या मुलीचे लग्न एका लष्करी अधिकाऱ्याशीसोबत झाले होते. तिच्या सासरच्या मंडळींकडून वारंवार अत्याचार करण्यात येत होता. एके दिवशी तिला आपल्या मुलीच्या आत्महत्येची बातमी कळली. महिलेनं सांगितलं की, मुलीच्या मृत्यूचा खोटा पोस्टमॉर्टम अहवाल तयार करण्य़ासाठी डॉक्टरवर दबाव टाकण्यात येत होता.

महिलेनं दावा केला की, दीपालीचा मृत्यू नैसर्गिक झाल्याचे शवविच्छेदन अहवालात म्हटलं आहे. भाग्यश्रीनं या घटनेची योग्य चैकशी करण्याची मागणी केली आहे. भाग्यश्रीनं दिलेल्या माहितीनुसार, मुलगी दीपालीचं लग्न लष्करी अधिकारी अजिंक्य हणमंत निंबाळकर यांच्याशी झाले होते. दीपालीच्या सासरच्या मंडळींकडून जाच होता. वारंवार मारहाण देखील करण्यात येत होती.

१९ ऑगस्ट रोजी अजिंक्यने दीपालीला रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. मात्र, रूग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी दीपालीचा मृ्त्यू झाल्याचे सांगितले. भाग्यश्रीने सांगितले की, दीपालीचा मृत्यू नैसर्गिक नसून हत्या असल्याचं संशय त्यांनी व्यक्त केला. अजिंक्यच्या कुटुंबाने राजकीय तसेच पोलिसांच्या संबंधाचा वापर करून शवविच्छेदन अहवालात बदल केला, असा आरोप भाग्यश्रीने केला. घटनेच्या एक महिन्यानंतर पोलिसांनी शवविच्छेदन अहवाल तिला सोपवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Actor Dies: अवघ्या २५ व्या वर्षी आयुष्य संपवणारा 'हा' मराठमोळा अभिनेता कोण?

Phaltan Doctor Case: PSI बदनेसोबत ६ महिने संपर्क, आत्महत्येपूर्वी बनकरला फोटो अन् मेसेज पाठवले; रुपाली चाकणकरांचा धक्कादायक खुलासा

Maharashtra Live News Update: भर दिवसा सराफ व्यावसायिकाचे लुटमार आणि अपहरणाची धक्कादायक घटना

Unseasonal Rain Damages: अवकाळीचा दुहेरी फटका! कांदा-मका पाण्यात|VIDEO

Guhagar Tourism: विकेंड ट्रीपसाठी परफेक्ट ठिकाण! मुंबईहून फक्त ५ तासांत पोहोचाल सुंदर गुहागरला

SCROLL FOR NEXT