Pune News Saam TV
महाराष्ट्र

Pune News: व्हॅाट्सॲप ग्रुप हल्ला प्रकरणात नवा खुलासा; नेमकं काय घडलं त्या दिवशी?

कोणत्याही व्यक्तीची जीभ कापली नव्हती अशी माहिती समोर आली आहे.

Ruchika Jadhav

Pune News: पुण्यातील फुरसुंगी भागात व्हाट्सअप ग्रुपमधून काढल्याच्या वादातून एकाला बेदम मारहाण करत जीभ कापल्याची धक्कदायक घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ पसरली. अशात आता या बाबात एक मोठा खुलासा झाला आहे. कोणत्याही व्यक्तीची जीभ कापली नव्हती अशी माहिती समोर आली आहे. (Latest Pune News)

सोसायटीतील सदस्यांनी काढलेल्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधून रिमूव्ह केल्यावरून बाचाबाची झाल्यानंतर पाच जणांनी ग्रुप अ‍ॅडमिनला बेदम मारहाण केली. मारहाणीत या टोळक्याने अ‍ॅडमिनची जीभच कापली. त्यांच्या जीभेला टाके पडले असून, यात ते गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पसरवली जात होती.

मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार, तोंडात फटका लागल्याने जिभेत रक्त आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. संबंधित आरोपींवर ३२४ चा गुन्हा दाखल केला आहे. "ओम हाईट्स ऑपरेशन" या नावाने व्हॉट्सअप ग्रुप तयार केला होता. त्यात सर्व सदस्य होते. तक्रारदारांचे पती या ग्रुपचे अ‍ॅडमिन होते. दरम्यान, प्रकरणातील आरोपीला त्या ग्रुपमधून रिमूव्ह म्हणजे काढून टाकले.

ग्रुपमध्ये कोणीही कसलेही मेसेज करत असल्याने ग्रुपच बंद केला असल्याचे अॅडमिनने सांगितले. अशात आरोपीला याचा राग आल्याने त्याने इतर पाच जणांसोबत येऊन तक्रारदारांना मारहाण केली. त्यांच्या तोंडावर बुक्की मारली, या बुक्कीचा फटका इतका जोरात होता की, दातासह जिभेवर त्याचा मार लागला. त्यामुळे रक्त येत होते. कोणीही त्यांची जीभ कापली नव्हती अशी माहिती, पोलिस निरिक्षक अरविंद गोकुळे यांंनी दिली. पोलिसांनी या प्रकरणी ३२४ चा गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Holiday List: उद्या बँकेत काम असेल तर थांबा! महाराष्ट्रासह अनेक राज्यांत बँका बंद

Chocolate Milkshake Recipe: घरच्या घरी बनवा थंडगार टेस्टी चॉकलेट मिल्कशेक; वाचा सोपी रेसिपी

Diabetes Diet : फक्त ५ सेकंदांत जाणून घ्या, डायबिटीजच्या रुग्णांनी कोणती कडधान्य खाऊ नयेत

Accident : कॉलेज सुटल्यानंतर घराकडे जाताना काळाचा घाला, आयटीआय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू, २ जण जखमी

Pelvic floor exercises: प्रसूतीनंतर लघवीवर नियंत्रण राहत नाही? गर्भावस्थेत केलेला हा सोपा व्यायाम ठरू शकतो फायदेशीर

SCROLL FOR NEXT