bogus  Saam tv
महाराष्ट्र

Crop insurance : पीकविमा योजनेत मोठे बदल; बोगस शेतकऱ्यांना काळ्या यादीत टाकणार? VIDEO

Crop insurance Update : खरीप हंगामाच्या पार्श्वभुमीवर सरकारने आता बोगस पीकविमा लाटणाऱ्यांना दणका दिलाय... त्यासाठी नवी नियमावली जारी केलीय.. मात्र या नियमावलीत नेमकं काय आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

Bharat Mohalkar

घोटाळ्यांचं कुरण ठरलेली 1 रुपयात पीक विमा योजना सुधारणा करण्याऐवजी बंद करण्यात आली.. मात्र त्यानंतर आता सरकारने आपला मोर्चा बोगस पीक विमा लाटणाऱ्या दलालांकडे वळवलाय... या पार्श्वभुमीवर सरकारने पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत मोठे बदल करत शेतकऱ्यांना काळ्या यादीत टाकण्याचा इशारा देण्यात आलाय.

पीकविम्यासाठी नवे नियम

ई-पीक पाहणी आणि अॅग्रिस्टॅक ओळख क्रमांक बंधनकारक

नोंदणी आणि प्रत्यक्ष पीकविम्याच्या क्षेत्रात तफावत आढळल्यास पीकविमा रद्द

संबंधित शेतकऱ्याला काळ्या यादीत टाकणार

काळ्या यादीतील शेतकरी पुढील 5 वर्षे कृषी विभागाच्या योजनांसाठी अपात्र

अकृषिक, सरकारी, देवस्थान, ट्रस्टच्या जमिनींचा विमा काढता येणार नाही

एक रुपयात विमा हप्ता मिळणार नाही

खरीप हंगामातील कांदा आणि कापूस पिकांसाठी 5% विमा हप्ता

खरीप हंगामात राज्यात 142 लाख हेक्टरवर पेरणी होते.... तर 2024 मध्ये 72 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेसाठी अर्ज केला होता.. मात्र आता सरकारने कठोर नियम केल्याने हा आकडा आणखी घसरण्याची शक्यता आहे..

पीकविमा योजनेत सहभागासाठी 31 जुलै शेवटची तारीख आहे... मात्र आता अॅग्रीस्टॅक ओळखपत्र आणि ई पीक पाहणी बंधनकारक असल्याने बोगस पीकविमा लाटणाऱ्या शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे या नव्या नियमावलीमुळे खरंच पीकविम्यातील बोगसगिरी थांबणार की योजनांचे दलाल नवी पळवाट काढून घोटाळा सुरुच ठेवणार? याकडे राज्यातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Priya Marathe Passes Away : मराठी अभिनेत्री प्रिया मराठे यांचं निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

Hair dye reaction: केसांना कलर केल्यास होऊ शकते रिएक्शन; अॅलर्जी झाल्यास दिसतात 'ही' लक्षणं, वेळीच ओळखा

Manoj Jarange Patil Protest Live Updates : मराठा आरक्षण उपसमितीची आज पुन्हा बैठक

Kumbha Rashi : आरोग्याची समस्या, पण ध्यान-प्रार्थनेत दडलेले गुपित यश, वाचा राशीभविष्य

Smartphone Addiction : रात्री झोपण्यापूर्वी फोन वापरणं ठरतंय घातक, तज्ज्ञांचा इशारा

SCROLL FOR NEXT