New Amrit Bharat Express Trains From Gorakhpur To Delhi And Mumbai Saam Tv
महाराष्ट्र

Amrut Bharat Express : प्रवाशांसाठी खुशखबर! मुंबईतून धावणार आणखी एक अमृत भारत एक्स्प्रेस, कोणत्या स्थानकांवर थांबणार?

Amrut Bharat Express Train News : गोरखपूरहून दिल्ली आणि बांद्र्यासाठी दोन नवीन अमृत भारत एक्सप्रेसला रेल्वे बोर्डाची मंजुरी. मार्ग, वेळापत्रक, थांबे आणि प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधांची माहिती जाणून घ्या.

Alisha Khedekar

  • गोरखपूरहून दिल्ली आणि बांद्र्यासाठी दोन नवीन अमृत भारत एक्सप्रेस करण्यासाठी मंजुरी

  • उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रातील अनेक शहरांना फायदा होणार

  • २२ डब्यांच्या या ट्रेनमध्ये १,८०० पेक्षा जास्त प्रवाशांची क्षमता

  • अनेक सुविधा उपलब्ध

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. गोरखपूरहून दिल्ली आणि मुंबईदरम्यान दोन नवीन अमृत भारत एक्सप्रेस सुरू करण्यासाठी रेल्वेने मंजुरी दिली आहे. दोन्ही गाड्यांसाठी वेगवेगळे अमृत भारत रॅकही उभारण्यात आले आहे . त्यामुळे गोरखपूरसह उत्तर प्रदेशातील अनेक शहरांची दिल्ली आणि मुंबईशी कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत होणार आहे.

पहिली ट्रेन गोरखपूर-दिल्ली अमृत भारत एक्सप्रेस नंबर 15095/15096 ही गाडी दर गुरुवारी रात्री १०:४५ वाजता गोरखपूरहून सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १२:५० वाजता दिल्लीला पोहोचेल. परतीची गाडी दर शुक्रवारी दुपारी २ वाजता दिल्लीहून सुटेल आणि शनिवारी सकाळी ६:२५ वाजता गोरखपूरला पोहोचेल. खलीलाबाद, बस्ती, गोंडा, सीतापूर, बरेली, मुरादाबाद आणि गाझियाबादसह प्रमुख स्थानकांवर तिचे थांबे असतील.

तर दुसरी ट्रेन गोरखपूर-बांद्रा अमृत भारत एक्सप्रेसचा नंबर 15085/15086 ही गाडी दर शुक्रवारी सकाळी ७:५० वाजता गोरखपूरहून रवाना होऊन शनिवारी संध्याकाळी ६ वाजता बांद्र्याला पोहोचेल. परतीची गाडी शनिवारी रात्री ९:२० वाजता सुटून सोमवारी सकाळी ६:४५ वाजता गोरखपूरला पोहोचेल. कानपूर, आग्रा, कोटा, रतलाम, वडोदरा, सूरत, वापी, पालघर आणि बोरीवलीसह अनेक शहरांना याचा फायदा होईल.

या २२ डब्यांच्या अमृत भारत ट्रेनमध्ये १,८०० हून अधिक प्रवासी प्रवास करू शकतील. एसी कोच नसले तरी आरामदायी सीटिंग व्यवस्था, बायो-टॉयलेट, सीसीटीव्ही आणि आपत्कालीन परिस्थितीत लोको पायलट किंवा ट्रेन मॅनेजरशी थेट संपर्क साधण्यासाठी टॉक-बॅक प्रणाली यांसारख्या सुविधा उपलब्ध असतील. या एक्सप्रेसचा कमाल वेग १३० किमी प्रतितास असलेल्या या गाड्यांमुळे प्रवास अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित होण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाची ज्ञानेश कुमारांना नोटीस SIR विरोधातील लढाईला कायदेशीर बळ?

काशी विश्वनाथाच्या कळसाचं सोनं चोरीला? PMO कडे तक्रार,मंदिर प्रशासनानं आरोप फेटाळले

Friday Horoscope: अडकलेली कामं पूर्ण होतील, या 4 राशींच्या नशीबी आज पैसा; वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

16 ऑक्टोबरला सरकारविरोधात CJPचा तिरंगा मोर्चा, कनॉट प्लेसचं 'जंतरमंतर' होणार

Fact Check: व्हॉट्सअॅपवर 'NO' लिहाल अकाऊंटमधील पैसे गमवाल? छोट्याश्या चुकीमुळे कष्टाचे पैसे घालवून बसाल?

SCROLL FOR NEXT