Fraud Online Part Time Job Saam TV
महाराष्ट्र

Online Part Time Job Fraud: पोस्ट लाइक करा आणि पैसे मिळवा! आश्वासनं देऊन लाखोंची फसवणूक; पोलिसांकडून तिघांना अटक

Fraud Online Part Time Job In Nerul: टेलिग्रामवर ऑनलाईन टास्क पूर्ण करून कमी कालावधीत लाखो रुपयांची कमाई करण्याचे अमिश नागरिकांना दाखवण्यात यायचे. सुरुवातीला टास्क पूर्ण झाल्यावर काही पैशाची मागणी करून त्या बदल्यात जास्त पैसे देण्यात येत होते.

Ruchika Jadhav

सिद्धेश म्हात्रे

Nerul Crime News:

टेलिग्रामवर पार्ट टाइम नोकरीचे आमिष दाखवून नवी मुंबईतीली नागरिकांची लाखोंची फसवणूक झाल्यची घटना उघडकीस आली आहे. फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा डाव नवी मुंबई गुन्हे शाखेने उधळून लावलाय. पोलिसांनी आरोपींना सापळा रचून ताब्यात घेतलं आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नेमकं काय घडलं?

नेरुळमधील हावरे सेंचुरियन मॉलमध्ये एक कॉल सेंटर टाकण्यात आले होते. यातून देशभरातील नागरिकांची ऑनलाईन फसवणूक करण्यात येत होती. टेलिग्रामवर ऑनलाईन टास्क पूर्ण करून कमी कालावधीत लाखो रुपयांची कमाई करण्याचे अमिश नागरिकांना दाखवण्यात यायचे. सुरुवातीला टास्क पूर्ण झाल्यावर काही पैशाची मागणी करून त्या बदल्यात जास्त पैसे देण्यात येत होते.

मात्र नंतर विविध बँक खात्यावर पैसे मागवण्यात आले. जे परत न करता नागरिकांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आली असून हे तिघेही सायबर गुन्हेगारीचे हब समजले जाणाऱ्या अलवार जिल्ह्यातून आले होते. नवी मुंबई गुन्हे शाखेने पैसे मागविण्यात आलेल्या सर्व बँक खात्यांची चौकशी करत नेरुळमधील हावरे सेंचुरियन मॉलमध्ये धडा टाकून तीनही आरोपींना अटक केलीये.

पोलिसांनी आरोपींच्या बँक खात्यातील 85 लाख रुपये देखील गोठवले आहेत. या आरोपींनी देशभरातील अनेक नागरिकांची ऑनलाईन फसवणूक केली असून आरोपींवर अन्य राज्यातही अनेक गुन्हे दाखल असल्याचे समोर आलेय.

उल्हासनगरमध्ये घरात घुसून मोबाईलची चोरी

उल्हासनगर कॅम्प क्रमांक चार येथील गुरुनानक शाळा परिसरात राहणारे संजय अशोक सावंत यांच्या घरी मोबाईल चोरी झाली आहे. घराचा दरवाजा उघडून घरात घुसून चोरट्यांनी मोबाईल लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलीस सिसिटिव्ही कॅमेऱ्याच्या अधारे चोराचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

Thackeray Brothers : ठाकरेंच्या लढ्याला दक्षिणेचा पाठिंबा, थेट मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक, म्हणाले प्रेरणादायी...

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

SCROLL FOR NEXT