Pimpri Chinchwad Crime News : व्यापारी रात्री दुचाकीवरून २७ लाख रुपये घेऊन घरी निघाला होता; वाटेत अचानक भयानक घडलं!

Pimpri-Chinchwad Crime News :पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती गुन्हेगारी सध्या चिंतेचा विषय बनत आहे. व्यापाऱ्याची लूट केल्याची अशीच एक घटना निगडी पोलीस हद्दीत घडली होती. यातील आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
Pimpri-Chinchwad Crime News
Pimpri-Chinchwad Crime NewsSaam Digital
Published On

गोपाळ मोटघरे, पिंपरी-चिंचवड

Pimpri-Chinchwad Crime News

पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती गुन्हेगारी सध्या चिंतेचा विषय बनत आहे. गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरात रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांची लूटमार तसेच चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. व्यापाऱ्याची लूट केल्याची अशीच एक घटना निगडी पोलीस हद्दीत घडली होती. यातील आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pimpri-Chinchwad Crime News
Crime News: आईच्या मृतदेहासोबत दोन बहिणींचं वर्षभर घरात वास्तव्य; कारण ऐकून सर्वांनाच धक्का बसला

पोलिसांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, निगडी पोलीस स्टेशन हद्दीतील यमुनागर या परिसरात १४ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजेच्या दरम्यान व्यापारी प्रकाश भिकचंद लोढा आपल्या दुचाकीवरून जात होते. त्याच रस्त्यावरून दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी प्रकाश लोढा यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकत त्यांच्याजवळील तब्बल २७ लाख २५ हजार ८०० रुपयांची रक्कम लंपास केली.

व्यापाऱ्याने घटनेनंतर व्यापारी लोढा यांनी पोलिसात धाव घेत याबाबत रितसर तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ या घटनेचा तपास सुरू केला. पोलिसांनी परिसरातील २५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्याआधारे पाच आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

आरोपींची नावे

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून ११ लाख ३५ हजार ४०० रुपये जप्त केले आहेत. विशाल जगताप, लालबाबू जयस्वाल, जावेद काझी, अभिषेक बोकडे आणि धीरेंद्र सिंग आसवानी सिंग अशी पाच आरोपींची नावे आहेत.

Pimpri-Chinchwad Crime News
Ulhasnagar Crime News: बाईकमधील पेट्रोल चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद! नेमकं केलं काय?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com