Manasvi Choudhary
रेमंड ग्रुपचे मालक गौतम सिंघानिया मागील काही दिवसांपासून चर्चेत आहेत.
अलिकडेच गौतम सिंघानिया यांनी सोशल मीडियावर घटस्फोटासंबंधीत पोस्ट शेअर केली होती.
गौतम सिंघानिया यांनी पत्नी नवाज मोदी सिंघानियापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतलाय.
गौतम आणि नवाज सिंघानिया यांना निहारिका आणि निसा या दोन मुली आहेत.
गौतम सिंघानिया यांचा घटस्फोट हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात महागडा घटस्फोट असल्याचं म्हटलं जातंय.
माहितीनुसार, नवाज मोदी सिंघानिया यांनी पती गौतम सिंघानिया यांच्याकडून कौटुंबिक सेटलमेंटसाठी एकूण संपत्तीपैकी ७५ टक्के रक्कम मागितली आहे.
नवाज मोदींनी त्यांच्या दोन मुलींच्या पालनपोषणासाठी हा खर्च मागितल्याचे स्पष्ट केले आहे.
गौतम सिंघानिया हे भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपतीपैंकी एक आहेत. त्यांची एकूण संपत्ती १.४ अब्ज डॉलर इतकी आहे.
नवाज मोदी यांनी घटस्फोटासाठी ८,७४५ कोटी रुपयांची मागणी केली आहे