Nagpur Crime News Saam TV
महाराष्ट्र

Nagpur Crime News : पुतण्यानेच काकूवर केला चाकू हल्ला; घटनेमागचं कारण ऐकून तुम्हीही हादरून जाल...

संपत्तीच्या मोहाने आजवर अनेकांचा जीव घेतला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Nagpur News : सध्याच्या युगात संपत्तीच्या मोहात अनेक व्यक्ती आपल्याच नातेवाईकांशी वाद घालतात. बऱ्याचदा रागाचे आणि वादाचे रुपांतर हाणामारीत देखील होते. संपत्तीच्या मोहाने आजवर अनेकांचा जीव घेतला आहे. नागपूर येथून सध्या अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेत एका पुतण्याने आपल्या काकीवर हल्ला केला आहे. (Latest Marathi News)

संपत्तीसाठी काकूवर हल्ला

वडिलोपार्जित संपत्तीच्या हिस्से वाटणीवरून झालेल्या वादात पुतण्याने आपल्या काकूवर चाकू हल्ला केला आहे. चाकू हल्ला करत त्याने काकूला जिवेमारण्याचा प्रयत्न देखील केला. शुक्रवारी सायंकाळी सदर घटना घडली आहे. जखमी महिलेस उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीलिमा उर्फ कल्पना वाघ असे जखमी महिलेचे नाव तर सुमित वाघ असे आरोपी पुतण्याचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी पुतण्या व त्याच्या एका मित्राला अटक केली असून दोन आरोपी अद्यापही फरार आहेत. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

वडिलोपार्जि असलेल्या संपत्तीवरून गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांमध्ये वाद सुरू होते. प्रत्येकाला आपल्या वाट्याला जास्तीचा हिस्सा हवा होता. सुमितला आपल्या संपत्तीमधील जास्तीचा वाटा हवा होता. मात्र त्याला तो वाटा मिळवण्यासाठी काकू मार्गात अडथळा बनत होती. त्यामुळे त्याने काकूची हत्या करण्याचा कट रचला. तसेच त्यांच्यावर चाकू हल्ला केला. सुदैवाने या घटनेत काकू बचावल्या आहे.

लहान भावाकडून मोठ्या भावाची निर्घृण हत्या

दोन दिवसांपूर्वी नाशिक येथे देखील अशीच एक घटना घडली. कौटुंबिक वादातून लहान भावाने आपल्या मोठ्या भावाच्या डोक्यात लाकडी दांडा टाकून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली. सदाशिव दामू निकम असे मृताचे नाव असून नाशिकच्या कामटवाडे परिसरातील गोपाल चौक येथे हा भयंकर प्रकार घडला होता. या घटनेने परिसरात खळबळ उडाली.

याबाबत अधिक माहिती अशी की, संशयित आरोपी हरी दामू निकम (वय, 50) हा गुरुवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास मद्यपान करून घरी आला. यावेळी त्याने मोठा भाऊ सदाशिव दामू निकम वय 55 यांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. यामुळेच सदाशिव निकम यांनी त्याचा जाब विचारला असता हरी दामू निकम याने त्यांच्यावर हल्ला केला.

या मारहाणीत सदाशिव निकम हे जखमी झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी त्वरित जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत झाल्याचे घोषित केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blocked Arteries Symptoms: हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यावर दिसतात 'ही' लक्षण, दुर्लक्ष केल्याने वाढेल हार्ट अटॅकचा धोका

Maharashtra Live News Update: पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात पुन्हा अपघात, २ जणांचा मृत्यू

IND W vs SA W Final World Cup 2025: नवी मुंबईत पाऊस धुमाकूळ घालणार, फायनल रद्द झाली तर विश्वचषकाची ट्रॉफी कुणाला? वाचा

HBD Shah Rukh Khan : "हार के जीतने वाले को बाजीगर कहते हैं"; SRK चे 8 आयकॉनिक डायलॉग्स

India Likely XI: संजू सॅमसन OUT, हर्षितचाही पत्ता कट होणार, प्लेईंग ११ मध्ये ३ बदलाची शक्यता

SCROLL FOR NEXT