Nepal Protest News Saam Tv
महाराष्ट्र

Nepal Protest : नेपाळमध्ये अडकले महाराष्ट्रातील १५० जण, उपमुख्यमंत्र्यांनी फोन करून दिला दिलासा

Nepal Protest News : नेपाळमध्ये सोशल मीडियावर बंदी घातल्यानंतर तरुण आंदोलक संतप्त झाले असून आंदोलन हिंस्त्रक वळणावर पोहोचले आहे. आंदोलकांनी पंतप्रधान ओली यांचे घर जाळले, तर भारतातील हजारो पर्यटक नेपाळमध्ये अडकले आहेत.

Alisha Khedekar

  1. नेपाळमध्ये 'जेन झी' आंदोलकांचा संताप उफाळला, आंदोलन हिंस्त्रक बनले.

  2. पंतप्रधान ओली यांचे घर जाळले गेल्याची घटना, ओली देश सोडून गेले.

  3. काठमांडू विमानतळ बंद, भारतातील हजारो पर्यटक नेपाळमध्ये अडकले.

  4. महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी प्रयत्नशील.

नेपाळमध्ये गेल्या काही दिवसांपासून 'जेन झी' आंदोलकांनी धुमाकूळ घातला आहे. सोशल मीडियावर बंदी घातल्यामुळे हे आंदोलन करण्यात आलं. मात्र या आंदोलनाला आता हिंस्त्रक वळण आले आहे. संतापलेल्या आंदोलकांनी पंतप्रधान ओली यांचं घर जळालं आहे. या घटनेने ओली यांनी देश सोडून पलायन केल्याची घटना घडली. दरम्यान नेपाळमध्ये अराजकाची स्थिती असून भारतातील एक हजार पर्यटक येथे अडकले आहेत.

नेपाळच्या सरकारने सोशल मीडियावर बंदी घातल्याने नेपाळ येथील तरुणाई संतापली. संतप्त झालेल्या तरुणाईने रस्त्यावर येऊन निदर्शने केली. या आंदोलनाला आटोक्यात आणण्यासाठी तेथील सुरक्षारक्षकांकडून अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात अनेक तरुणांचा गोळ्या लागून जीव गेला. या घटनेनंतर संतापलेल्या तरुणाईने पिछेहाट न करता सरकारच्या निर्णयाविरुद्ध लढा दिला. आणि अखेर सरकारने सोशल मीडियावरची बंदी उठवली. असे असले तरी अद्यापही नेपाळ मध्ये अराजकाची परिस्थिती कायम आहे.

या परिस्थितीत नेपाळमध्ये संचारबंदी लागू केल्याने भारतातले अनेक नागरिक अडकले आहेत. त्यात ठाणे जिल्ह्यातील मुरबाडमधील पर्यटकांचा समावेश आहे. तर पुणे आणि मुंबईमधील २३ जेष्ठ नागरीक नेपाळमध्ये अडकले आहेत. हे सर्व नागरिक पर्यटनाच्या हेतूने गेले असल्याची माहिती मिळाली आहे. या नागरिकांना मायदेशात कसे परतायचे हा प्रश्न पडला आहे. या पार्श्वभूमीवर भारतवासियांनी मायदेशी परतण्यासाठी भारत सरकारला व्हिडिओद्वारे विनंती केली आहे.

नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन वरून संवाद साधत त्यांना दिलासा दिला. या सर्व पर्यटकांना महाराष्ट्रात सुखरुप आणण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी मदत करीत असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी पर्यटकांना दिली. त्यांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी राज्य शासन केंद्र शासनाच्या मदतीने प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान जेन झीच्या आंदोलनामुळे लावण्यात आलेल्या संचारबंदीमुळे काठमांडू शहरातील विमानतळही बंद ठेवण्यात आले आहे. काठमांडूमधून पर्यटकांचा एक समूह बुधवारी मुंबईत परतणार होता. मात्र विमानतळ बंद असल्याने हे पर्यटक आज काठमांडूवरून विमानतळ सुरु झाल्यास रवाना होतील.

नेपाळमध्ये महाराष्ट्रातील जिल्ह्यांमधील अडकलेल्या नागरिकांची संख्या

  • अकोला - १३

  • यवतमाळ - १

  • पुणे - १९

  • ठाणे - ३४

  • मुंबई - ४

  • बीड - ११

  • लातूर - १

  • कोल्हापूर - १

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

KDMC : २७ गाव वगळून प्रभाग रचना करावी; केडीएमसीकडे काँग्रेस, उबाठा, मनसेची मागणी

Akola Riots : अकोला दंगल प्रकरणात सुप्रीम कोर्टचा पोलिसांना एफआयआर नोंदवण्याचा आदेश

Yoga For Thyroid: थायरॉईडचं नियंत्रण आता तुमच्या हातात, करा 'ही' सोपी योगासनं

MHADA Housing Lottery:पुण्यानंतर सोलापूर, कोल्हापूर, सांगलीतही म्हाडाच्या घरांची लॉटरी; लाभ घेण्यासाठी 'या' ८ गोष्टी अत्यंत महत्वाच्या

माझ्या दाजींना टॉर्चर...;मेहुण्याचा खळबळजनक खुलासा, बीडच्या माजी उपसरपंच मृत्यूप्रकरणात ट्विस्ट

SCROLL FOR NEXT