Nepal Flood Maharashtra citizen  Saam tv
महाराष्ट्र

Nepal Flood : नेपाळमध्ये पुराचा हाहाकार! महाराष्ट्रातील ६० नागरिक बेपत्ता, कुठल्या जिल्ह्यातून किती पर्यटक अडकले?

Nepal Flood Update News : नेपाळमधील भीषण पूर आणि भूस्खलनात महाराष्ट्रातील ६० नागरिक बेपत्ता असल्याची माहिती आहे. बचाव पथकांकडून शोधमोहीम सुरू असून भारतीय दूतावास आणि महाराष्ट्र सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

Alisha Khedekar

  • महाराष्ट्रातील ६० नागरिक नेपाळमधील भीषण पूर आणि भूस्खलनानंतर बेपत्ता

  • पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, कोल्हापूर आणि कोकणातील नागरिकांचा या गटात समावेश

  • चिनी बचाव पथक, नेपाळ लष्कर आणि पोलिसांकडून घटनास्थळी शोधमोहीम सुरू

  • दुर्घटनाग्रस्त भागातून ५०० हून अधिक मृतदेह सापडल्याची माहिती

सागर आव्हाड, पुणे

नेपाळमध्ये आलेल्या भीषण पूर आणि भूस्खलनामुळे मोठी जीवितहानी झाली असून, महाराष्ट्रातील तब्बल ६० नागरिक अद्याप बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या बेपत्ता नागरिकांमध्ये पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, कोल्हापूर आणि कोकणातील नागरिकांचा समावेश आहे. मुंबईतील ‘हिल्स अँड ट्रेल्स’ आणि काठमांडूतील ‘रिचा ट्रेक्स’ यांनी संयुक्त निवेदनाद्वारे ही माहिती दिली.

नेपाळ माउंटेनिअरिंग असोसिएशनच्या (NMA) बचाव पथकाने दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी केली आहे. दुर्घटनेच्या वेळी इमिग्रेशन सेंटरमध्ये भारतीय नागरिकांसह ५१७ परदेशी नागरिक आणि १२७ नेपाळी नागरिक असे एकूण ६४४ जण उपस्थित होते. डॉ. मिलिंद चितळे यांच्या नेतृत्वाखालील ६० जणांचा गट त्यावेळी एका इमारतीत वास्तव्यास होता. पुराच्या प्रचंड प्रवाहात ही इमारत वाहून गेल्याने या गटातील सर्वजण बेपत्ता झाले आहेत.

सध्या चिनी बचाव पथक, नेपाळ लष्कर आणि पोलिसांकडून घटनास्थळी शोधमोहीम सुरू आहे. व्हिडिओ फुटेज आणि हवाई पाहणीत परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे स्पष्ट झाले आहे. अद्याप या ठिकाणाहून कोणालाही सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलेले नाही, अशी माहिती ‘हिल्स अँड ट्रेल्स’चे प्रा. चारुहास जोशी आणि ‘रिचा ट्रेक्स’चे सांगे गुरुंग यांनी दिली. दुर्घटनाग्रस्त भागातून ५०० हून अधिक मृतदेह सापडल्याची माहिती असून, मृतदेहांची अवस्था खराब असल्याने ओळख पटवण्यासाठी डीएनए नमुने घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, नेपाळ सरकारने मृतांची अधिकृत आणि अंतिम संख्या अद्याप जाहीर केलेली नाही.

दरम्यान, ‘मैत्री’ संस्थेमार्फत यात्रेसाठी गेलेले महेश शेजवळ यांच्या नेतृत्वाखालील ६८ भाविक सुरक्षित आहेत. यात्रा पूर्ण केल्यानंतर हा गट सध्या नेपाळ-चीन सीमेवर पोहोचला आहे. पुरामुळे मुख्य मार्ग बंद झाल्याने आता ‘न्यालाम-कोदारी-तातोपानी’ या पर्यायी मार्गाने त्यांना काठमांडूकडे आणले जाणार आहे. भारतीय दूतावासाने काठमांडूमध्ये २४ तास सुरू असलेला मदत कक्ष स्थापन केला आहे. बेपत्ता नागरिकांच्या नातेवाइकांनी अधिक माहितीसाठी दूतावासाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्राचा आपत्ती व्यवस्थापन विभागही नेपाळ सरकारच्या सातत्याने संपर्कात असून, राज्यातील नागरिकांना सुरक्षित परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राहुल गांधी यांची पत्रकार परिषद सुरू

Trending Mangalsutra Designs : सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेले 5 स्टायलिश मंगळसूत्र; डिझाइन पाहून कोणतीही महिला होईल खूश

Tyanchi Vari: मराठी सिनेसृष्टीत नवा प्रयोग! भारतात पहिल्यांदाच AIच्या मदतीने बनलेला 'त्यांची वारी' होणार प्रदर्शित

Hair Loss : सकाळी उशीवर गळलेले केस दिसताहेत? रात्रीची हि सवय आत्ताच बदला

Manoj Jarange: आरक्षणासाठी मनोज जरांगे ११ व्यांदा उपोषणाला बसले, आतापर्यंत किती वेळा आणि कुठे केला एल्गार?

SCROLL FOR NEXT