Accused individuals linked to the NEET paper leak case, including professors and members of a Telegram-based mafia group involved in the exam scam saam tv
महाराष्ट्र

NEETचा पेपर फोडणारा 'माफिया ग्रूप', 402 जणांच्या टेलिग्राम ग्रुपचं रॅकेट

Inside the NEET Scam: नीट पेपरफुटीत रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत...NEET चा पेपर फोडण्यासाठी 402 जणांचा टेलिग्राम ग्रुपच तयार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय...महाराष्ट्रातील कोण-कोण होता या ग्रुपचा सदस्य...पेपर फोडण्याची मोडस ऑपरेंडी नेमकी कशी होती?...पाहूयात हा विशेष रिपोर्ट...

Girish Nikam

नीट-यूजी प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात सीबीआयच्या कारवाईने वेग घेतला आहे. लातूरमधील रसायनशास्त्राचा निवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णीला अटक केल्यानंतर पुण्यातील मॉर्डन कॉलेजच्या बायोलॉजीच्या प्राध्यापिका मनिषा मांढरेला अटक करण्यात आलीय. हे दोन्ही आरोपी NTA च्या तज्ज्ञ पॅनेलशी संबंधित होते. पेपर सेट करणे तसंच पडताळणी प्रक्रियेची जबाबदारी या दोघांकडे होती. याप्रकरणी आतापर्यंत 9 जणांना अटक झाली आहे. या रॅकेटमध्ये कोण-कोण आहेत ते पाहूयात..

NEET पेपरफुटीत

आतापर्यंत 9 जणांना अटक

पी. व्ही. कुलकर्णीं

(महाराष्ट्र)

मनिषा मांढरे

(महाराष्ट्र)

मनिषा वाघमारे

(महाराष्ट्र)

शुभम खैरनार

(महाराष्ट्र)

धनंजय लोखंडे

(महाराष्ट्र)

विकास बिवाल

(राजस्थान)

दिनेश बिवाल

(राजस्थान)

मांगीलाल बिवाल

(राजस्थान)

यश यादव

(हरियाणा)

हे गोरखधंदा चालवण्यासाठी यांनी एक टेलिग्रामचा ग्रुपच सुरू केला होता. कशी होती यांची मोडस ऑपरेंडी ते पाहूया

NEETचा पेपर फोडणारा 'माफिया ग्रूप'

-पेपर लिक करण्यासाठी 'प्रायव्हेट माफिया' नावाचा टेलिग्राम ग्रुप तयार केला होता

-टेलिग्राम ग्रुपमध्ये एकूण 402 सदस्य

- हा ग्रूप 2024 मध्येच पेपरफुटीसाठी तयार करण्यात आला होता

- 1 मे रोजी NEET चा पेपर अपलोड करण्यापूर्वी प्रायव्हेट माफिया ग्रूपच्या अ‍ॅडमिनने मेसेजमध्ये लिहिले होते की, आम्ही लवकरच पूर्ण पेपर अपलोड करत आहोत. त्याचा पासवर्ड LeakMafia@9466 आहे.

-या मेसेजनंतर रात्री 11:38 वाजता लीक झालेला पेपर ग्रुपमध्ये पोस्ट केला. यानंतर ऍडमिनचा दुसरा मेसेज आला. जो पेपर आम्ही पाठवला आहे. तो सोडवा. 99.99 टक्के शक्यता आहे की हाच पेपरमध्ये येईल.

दरम्यान मनिषा मांढरे २३ वर्षांपासून पुण्यातील मॉडर्न कॉलेजमध्ये कार्यरत आहेत. त्यांचा यापूर्वीचे रॅकॉर्ड क्लिन असल्याचं कॉलेज व्यवस्थापनाने स्पष्ट केलंय. NEET घोटाळ्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींनी पेपर फोडण्यासाठी विषय ठरवून घेतल्याची माहिती समोर आली आहे.

1-लातूरमधे 28 वर्ष प्राध्यापक राहिलेला आणि सध्या पुण्यात वास्तव्याला असलेला मास्टरमाईंड पी. व्ही. कुलकर्णी हा रसायनशास्त्राचा प्राध्यापक असल्याने तो याच विषयाचा पेपर फोडत होता

2- नाशिकमधून अटक करण्यात आलेला शुभम खैरनार हा त्याच्या साथीदारांच्या साहाय्याने जीवशास्त्राचा पेपर फोडत होता.

3- NEET परीक्षेत रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र या तीन विषयांची परीक्षा विद्यार्थ्यांना द्यावी लागते. एकूण 700 मार्कांच्या या परीक्षेत जास्तीत जास्त मार्क मिळवून देण्याचं आश्वासन आरोपींकडून विद्यार्थ्यांना दिलं जात होतं. संशय येऊ नये म्हणून संपूर्ण पेपर एकत्रितपणे न फोडता विषयवार फोडत होते

(पैशांच्या मोहापायी प्राध्यापकांनी शिक्षणासारख्या पवित्र पेशाशी बेईमानी करत लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचं पाप केलंय. मात्र आता टेलिग्राम माफिया ग्रूपची पाळमुळं किती खोलवर गेली आहेत आणि यामागे आणखी कोणती बडी धेंडं आहेत याचा तपास होणं गरजेचं आहे.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेचा विरोधात 1100 पानांचे आरोप पत्र दाखल

High Blood Pressure: मीठ न खाता ही BPचा त्रास वाढतोय? डॉक्टरांनी सांगितली ४ गंभीर कारणं, आत्ताच व्हा सावध

30 मेपासून जरांगेंचं पुन्हा आमरण उपोषण, 1994च्या धर्तीवर GR काढण्याची मागणी, जरांगेंच्या निशाण्य़ावर पुन्हा फडणवीस

राष्ट्रवादीत कुरघोडीचं राजकारण टोकाला? कारकुनी चूक नव्हे, पटेल-तटकरेंची गच्छंतीच?

धुळे हादरलं ! गळा दाबून महिलेला संपवलं; तरुणाचा मृतदेह गो-शाळेत लपवला,भोंदूबाबानं घडवलं दुहेरी हत्याकांड

SCROLL FOR NEXT