Satara
Satara Saam Tv
महाराष्ट्र

Satara: मरणानंतरही सुटत नाहीत त्यांच्या यातना; कास पठारनजीकच्या दुर्गम भागातील स्थिती

ओंकार कदम

सातारा : जागतिक वारसा स्थळ म्हणून जगाने दखल घेतलेल्या कास पठार (kass Pathar) पाहण्यासाठी आपल्या देशाच्या कानाकोप-यातून लोक येत असतात. परंतु या पठरापासून थोड्याच अंतरावर असणाऱ्या दुर्गम भागातील लोकांच्या यातना मरणानंतर सुटत नाहीत त्यांच्या या यातना पाहून मन सुन्न होत आहे. (satara Latest Marathi News)

कास (kass) पठार या सातारा (satara) परिसरातील दुर्गम अशा पिसाडी गावातील एका महिलेचा मृत्यू झाल्याने तिचा मृतदेह एका चादरीत गुंडाळून तो काठीला बांधून त्याची अक्षरशः कावड करत जंगलातून पायपीट करत मूळ गावी पिसाडीला न्यावा लागला. जाईबाई तुकाराम मरागजे या महिला (women) उपचारासाठी त्यांची कन्या पाराबाई विठ्ठल जाधव (जाधव उंबरी) या गावी आल्या होत्या.

याच गावी वयोमानाने त्यांचा नैसर्गिक रित्या मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह मूळगावी पिसाडी कारगाव येथे घेऊन जाताना हा सर्व खटाटोप करावा लागला. पिसाडी गावाला रस्ता मार्गाने जाण्यासाठी अंधारी कास जूंगटी ते कात्रेवाडी असा रस्ता आहे पण कात्रेवाडीतून तीन किलो मीटरवर असलेल्या पिसाडी गावाला तेथून पुढे रस्ता नाही. त्यामुळे गावातील लोकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते.

काहींना नकाेय पुनर्वसन

सर्व भाग जंगलाचा असल्याने वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असतो त्यामुळे ग्रामस्थांना रोजच जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. या गावातील काही लोकांचे येथून पुनर्वसन करावे अशी मागणी आहे तर काही लोकांना आपले मूळ गाव सोडायचे नाही असे समजते. त्यामुळे प्रशासनाची ह्या गावांमध्ये नागरी सुविधा पुरवण्याबाबत अडचणी येत असल्याचे दिसत आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lal Salaam Released In Hindi : रजनीकांत यांचा 'लाल सलाम' हिंदीमध्ये पाहायला मिळणार, कधी आणि कुठे होणार रिलीज?

Today's Marathi News Live: चिपळूण तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस, नदी, नाले तुडूंब

Pune Crime: प्रेयसीने संपर्क तोडला, प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या; धक्कादायक घटनेने पुणे हादरलं!

SRH vs PBKS: पंजाब की हैदराबाद; कोण मारणार बाजी? कसा राहिलाय दोन्ही संघांचा रेकॉर्ड?

Railway Crime : मनमाडला रेल्वे वॅगनमधुन इंधन चोरी; सहा रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक

SCROLL FOR NEXT