तळीये दुर्घटनेत शास्त्रीय अभ्यास अन नियोजनाची गरज - गृहमंत्री  गोपाल मोटघरे
महाराष्ट्र

तळीये दुर्घटनेत शास्त्रीय अभ्यास अन नियोजनाची गरज - गृहमंत्री

रायगड जिल्ह्यात तळिये गावात दरड कोसळुन जी जिवितहानी झाली, यावरती शास्त्रीय अभ्यास करुन नियोजन करण्याची गरज आहे. असे मत राज्याचे गृहमंञी दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले.

गोपाल मोटघरे

पुणे : सरहद संस्थेच्या वतीने कारगिल विजय दिवसाला बावीस वर्षे पुर्ण झाल्याचे औचित्य साधून, कोरोना काळात विशेष काम करणाऱ्या नागरिकांचा गौरव राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

हे देखील पहा -

माळीण मध्ये ज्या पध्दतीने कायमस्वरुपी नागरिकांचे पुनर्वसन करण्यात आले त्याच पद्धतीचे पुनर्वसन राज्य सरकार तळीये गावात करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. पश्चिम घाट क्षेत्रातील विकास प्रकल्पांवर बंधने आणणारा डॉ. माधव गाडगीळ समितीचा अहवाल अहवाल राज्यसरकारने का स्वीकारला नाही याबाबत विचारणा केली असता, याबाबत मला माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज कुंद्रा प्रकरणाचा तपास व पॅगेसस :

राज कुंद्रा प्रकरणात मुंबई पोलीस योग्य पद्धतीने तपस करत असून येणाऱ्या काळात अश्या गोष्टींची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी उपाययोजना करणार असल्याचे ते म्हणाले. तसेच पॅगेसस वापर करुन राज्यात फोन टॅप करणे किंवा महत्वाच्या व्यक्तींवर पाळत ठेवणे अशा घटना समोर येत आहेत तर याबाबतीत विशेष काम सुरू असल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले . दरम्यान दिलीप दिलीप वळसे पाटील आंबेगाव परिसरात ज्या ठिकाणी दरडप्रवण क्षेञ आहे त्याची पाहणी करणार आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Protein Rich Dals: एक वाटी डाळीमध्ये किती प्रमाणात प्रोटीन असतं?

Anushka Sharma : RCB च्या विजयानंतर अनुष्काची खास पोस्ट; विराटसोबत बेभान होऊन नाचली, मिसेस कोहलींचा आनंद गगनात मावेना | VIDEO

MLC Election : पुण्यात मोठा ट्वीस्ट! भाजप नेत्याला राष्ट्रवादीतून उमेदवारी, ३ तास आधी हातात घड्याळ घेतलं अन्...

Maharashtra News Live Update: कोकण किनारपट्टीवर मासेमारीला ब्रेक

Political News : पश्चिम बंगालच्या मंत्रिमंडळात मोठा विस्तार, ३५ आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

SCROLL FOR NEXT