शेवगावात पावसाने थैमान घातले आहे. 
महाराष्ट्र

महापुरात मंदिरासह पुजारी गेला वाहून, एनडीआरएफ दाखल

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

अहमदनगर : नगर जिल्ह्यातील शेवगाव आणि नगर तालुक्यात पावसामुळे हाहाःकार उडाला आहे. एका व्यक्तीसह अनेक जनावरे वाहून गेली. तालुक्यातील नांदणी, चांदणी, ढोरा, भागिरथी या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. अनेक गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे.

आखेगाव, खरडगाव, वरुर, भगूर, वडूले पुराच्या पाण्याने बाधित झाली आहेत. मंदिरातील पुजारी पाण्यात वाहून गेल्याचे सूत्रांनी सांगितले. काही भागात पुराच्या पाण्यात लोकं अडकून पडल्याने राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे पथक जिल्ह्यात दाखल झाले आहे. बोटीतून त्यांनी लोकांना वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. एनडीआरएफचे तब्बल ३० जवान लोकांच्या मदतीला धावून आले आहेत.NDRF team arrives in Shevgaon to help people

सोमवारी रात्रभर झालेल्या पावसाने तालुक्यातील नंदिनी, चांदणी, वटफळी नदीला पूर आला आहे. या पुराच्या पाण्यात शंभरजण अडकल्याचे समजते. पुरामुळे गावकऱ्यांनी घरावर आश्रय घेतला. वडुले येथील मुरलीधर अनंदा सागडे हे साईबाबा मंदिरात दर्शनासाठी गेले होते. मात्र, पुराच्या पाण्यात ते वाहून गेले.

आखेगाव येथील पुल पाण्याखाली गेल्याने तालुक्यातील नगर,पांढरीपुल, नेवासा, गेवराई हे सर्व प्रमुख मार्ग बंद झाले. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होऊन दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आमदार मोनिका राजळे, माजी आमदार चंद्रशेखर घुले, सभापती डॉ. क्षितीज घुले, भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, माजी सभापती अरुण लांडे, भाकपचे सुभाष लांडे आदी नेते मंडळी मदतीसाठी उतरली आहे.NDRF team arrives in Shevgaon to help people

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : मुंबई कुणाची? ठाकरे, भाजप, शिंदे कुणाचा कोणत्या मतदारसंघात उमेदवार विजयी?

Broccoli Dishes: हिवाळ्यात सुपरफुड पेक्षा कमी नाही 'ब्रोकोली', आहारात समावेश करून पाहा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: कर्जत-जामखेडमधून रोहित पवार विजयी

Ajaz Khan : सोशल मीडियावर हवा; मात्र राजकारणात डब्बागुल,'बिग बॉस' फेम अभिनेत्याचा दारूण पराभव

Tourist Spots: भारतातील सर्वाधिक भेट दिलेले 'ही' ५ पर्यटन स्थळ

SCROLL FOR NEXT