सातारा : राज्यातील पूरपरिस्थिती आणि विविध जिल्ह्यात काेसळलेल्या दरडींमुळे बुहतांश ठिकाणी घरे माती खाली गाडली गेली आहेत. यामुळे अनेकांची जीव देखील गेले आहेत. काही जणांचे मृतदेह सापडत आहेत तर काहींचा शाेधण घेतला जात आहे. ही कठीण परिस्थिती प्रामुख्याने एनडीआरएफच्या माध्यमातून हातळली जात आहे. (ndrf-deployed-8-more-teams-in-flood-affected-areas-in-maharashtra)
एनडीआरएफने ndrf बचाव कार्य पथक वाढविली आहे. नवीन आठ पथके एनडीआरएफने राज्याच्या विविध भागात पाठविली आहेत. प्राथमिक माहितीनूसार ही एनडीआरएफची पथके सध्या ठाणे २, रत्नागिरी ६, सिंधूदूर्ग २, काेल्हापूर ६, सांगली ४, सातारा ४, पुणे ४, रायगड, पालघर, मुंबई येथे कार्यरत आहेत.
सध्या राज्याच्या विविध विभागात २६ पथक कार्यरत आहेत. आता नव्याने आठ पथकांना मदतीसाठी पाठविण्यात आल्याने त्याची संख्या ३४ पर्यंत पाेचली आहे.
सातारा जिल्ह्यात मिरगाव ता. पाटण येथील एनडीआरएफच्या मदतीने कार्यवाही सुरु आहे. शनिवारी रात्री दहा वाजेपर्यंत 6 मृतदेह मिळाले आहेत. अजून 4 लोकांचा शोध सुरु आहे. ढोकावळे ता. पाटण येथे एनडीआरएफची मदतीने कार्यवाही पूर्ण झाली असून तिथे 4 मृतदेह मिळाले आहेत. आंबेघर ता. पाटण येथे एनडीआरएफची मदतीची कार्यवाही सुरु. आता पर्यंत 11 मृतदेह मिळाले आहेत अशी माहिती जिल्हा प्रशासनाने शनिवारी रात्री दहा वाजता दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.